shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

भाजप प्रदेशाध्यक्षांच्या दौर्यात शनिशिंगणापुरातील नियमावली मोडली..!!

शिर्डी एक्स्प्रेस लाईव्ह वृत्तसेवा अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी- दिपक हरिश्चंद्रे.                                       रविवार दिनांक २५ सप्टेंबर २०२२

भाजप प्रदेशाध्यक्षांच्या दौर्यात शनिशिंगणापुरातील नियमावली मोडली..!!

नेवासा : भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे शनिशिंगणापूर दौर्यावर होते. यावेळी भाजप कार्यकर्त्यांनी एकच गर्दी केल्याने शनिशिंगणापूर देवस्थानने केलेली नियमावली तुटली आहे. यामुळे भाविकांमधून नाराजी व्यक्त होत आहे.

भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे शनिशिंगणापूर येथे शनिदेवाच्या दर्शनासाठी आले होते. यावेळी भाजपाचे माजी आमदार शिवाजी कर्डिले, माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे यांच्यासह तालुक्यातील व जिल्ह्यातील भाजप पदाधिकारी उपस्थित होते.

शिंगणापूर देवस्थानने चौथर्यावर आरतीच्या वेळी किती भाविकांनी उपस्थित रहावे, यासाठी नियमावली केलेली आहे. ती नियमावली भाजपाचे प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांच्या दौर्याच्या वेळी भाजपच्या उत्साही कार्यकर्त्यां मुळे मोडली गेली. 

          त्यामुळे उपस्थित भाविकांनी नाराजी व्यक्त केली आहे. बावनकुळे यांच्याकडून नियमावलीचे पालन झालेले आहे. मात्र भाजपाच्या काही कार्यकर्त्यांकडून नियमावली उल्लंघन झाले. त्यामुळे भाविकांमधून नाराजी व्यक्त केली जात आहे.

       प्रत्येक राजकीय पक्षाच्या नेत्याने  तीर्थस्थळांच्या दौर्यावर येताना तेथील नियमावली मोडली जाणार नाही याची काळजी घेणे गरजेचे आहे. तसेच स्वत: दर्शनाला येताना कार्यकर्ते कशाला बोलवायचे असा सवाल सर्वसामान्य यांमधून केला जात आहे.

Shirdi Express Live🎥#करीता बातम्या📰🗞️ आणि जाहिराती 🖼️साठी संपर्क @दिपक हरिश्चंद्रे (अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी )📲7350591600


close