shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

अमृतमहोत्सवी श्रीरामपूरनिमित्त 'माझ्या अनुभवातील श्रीरामपूर'विषयी लेख पाठविण्याचे आवाहन ..!

श्रीरामपूर (शौकतभाई शेख) :
सन १९४७ ते २०२२ या  ७५ वर्षात श्रीरामपूर शहराने अनेक क्षेत्रीय प्रगती केली आहे.

दिनांक ०१ सप्टेंबर १९४७ ते २५ एप्रिल १९५३ या काळात श्रीरामपूर नगर परिषदेचे पहिले        नगराध्यक्ष रामचंद्र महाराज उपाध्ये होते. त्यानंतर अनेक नगराध्यक्ष झाले,त्यांनी श्रीरामपूर या आधुनिक नगरीची शिस्तबद्ध आणि सर्वसमावेशक पद्धतीने  विविध अंगाने प्रगती केली.अनेक राजकीय, सामाजिक,सांस्कृतिक, साहित्यिक,धार्मिक,औद्योगिक व्यावसायिक इत्यादी क्षेत्रात प्रगती झाली आहे, श्रीरामपूरच्या या जडणघडणीचे आपण साक्षीदार आहोत.या अनुभवावर आधारित 'माझ्या अनुभवातील श्रीरामपूर 'विषयी १००० शब्दांत, सकारात्मक दृष्टीने लिहिलेले लेख ३० सप्टेंबर २०२२ पर्यंत पुढील पत्त्यावर पाठवावेत. 

डॉ. बाबुराव उपाध्ये, 'निर्मिक', १९१, इंदिरानगर, श्रीरामपूर- ४१३७०९,  कृपया वेळेत लेख पाठवावे ही विनंती आहे.परीक्षक समितीला योग्य वाटतील असेच  लेख 'अमृमहोत्सवी श्रीरामपूर 'ह्या पुस्तकात छापण्याचे नियोजन आहे,त्यासाठी सुयोग्य असे लेख पाठविण्याचे आवाहन माजी प्राचार्य टी.ई.शेळके, माजी प्राचार्य शंकरराव अनारसे, माजी प्राचार्य डॉ.शंकरराव गागरे, सुखदेव सुकळे, प्रा.शिवाजीराव बारगळ,पत्रकार प्रकाश कुलथे, डॉ. शिवाजी काळे, डॉ.रामकृष्ण जगताप, कवयित्री संगीता फासाटे, गणेशानंद उपाध्ये इत्यादी संयोजक समितीने  केले आहे.
close