प्रतिनिधी : गणेश मराठे
नगर : ९ / हेमंत हा अहमदनगर जिल्ह्यामधील पारनेर तालुक्यातील वडझिरे गावचा रहिवासी असून व्यवसाय निमित्ताने सध्या पुण्यात स्थायिक असलेला हेमंत शालेय जीवना पासुन बाईक प्रेमी आहे . माध्यमिक शिक्षण घेत असताना हेमंत ने विज्ञान प्रदर्शनात कृत्रीम पाऊस कसा पाडला जातो हे प्रत्यक्षीक सादर करून प्रथम क्रमांक पटकावला होता. तेव्हा पासूनच हेमंतने वेगळं काहीतरी करायचं हा निश्चय केला होता.
नुकत्याच पुणे येथे आर्म्स फेस्टिव्ह डर्ट ट्रॅक रेस या प्रसिद्ध मोटारसायकल स्पर्धेत हेमंत मोरे हा या स्पर्धेत सुरू झाल्यापासून प्रत्येक राऊंड प्रथम क्रमांकावर राहुन प्रथम क्रमांकाची बाजी मारली . ही स्पर्धा द फेडरेशन ऑफ मोटार स्पोर्ट्स आफॅ इंडिया यांच्या वतीने या डर्ट ट्रॅक स्पर्धाचे आयोजन केले जाते. पुणे येथील गोळीबार मैदानावर झालेल्या २ दिवशीय या स्पर्धेत राष्ट्रीय पातळीवर ७० पेक्षा अधिक स्पर्धकांनी आपला सहभाग नोंदविला होता हि स्पर्धा १२ प्रकारात रायडिंग घेतली जाते. बुलेट ३५० सी.सी या वजदानर गाडीवर हेमंत मोरे यांनी अप्रतिम रायडिंग चे कौशल्य दाखवून या स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावला आहे. या ठिकाणी ट्रंक रस्ता हा विशेष तयार केला जातो .या स्पर्धेत रस्त्यावर चिखल, नागमोडी वळणे,माती सर्व काही असताना स्पर्धा म्हटल्यावर गाडी वेगात चालवणं आवश्यक असतं हे बाईक चालवण्याचे कौशल्य पाहण्यासाठी मोठ्या प्रमाणावर प्रेक्षक उपस्थित असतात. या ठिकाणी उपस्थित प्रेक्षकांची मने हेमंत ने जिंकली स्पर्धे साठी देशातील तसेच देशाबाहेर जाऊन विविध मोटर्स स्पोर्ट्स मध्ये सहभाग घेऊन यश मिळवले आहे. नुकतीच ऑगस्टमध्ये हिमाचल मध्ये पार पडलेली देशातील अतिशय अवघड रॅली ऑफ हिमालय २०२२ मध्ये बुलेट चालवून यश मिळवले आहे तसेच पुणे ते कन्याकुमारी हे अंतर कमीत कमी वेळेत बुलेटवर पार पाडण्याचा विक्रम हेमंतच्या नावावर आहे. या स्पर्धेतून अहमदनगर जिल्हा नाव देशाच्या कानाकोपऱ्यात पोहचत आहे हि बाब अहमदनगर जिल्हा वासीयांसाठी अभिमानास्पद आहे.

