shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

'राष्ट्रध्वज' उलटा फडकविल्या प्रकरणी शाळेतील मुख्याध्यापकांची निर्दोष मुक्तता..!!

शिर्डी एक्स्प्रेस लाईव्ह वृत्तसेवा अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी- दिपक हरिश्चंद्रे.
मंगळवार दिनांक ०६ सप्टेंबर २०२२ 
 
'राष्ट्रध्वज' उलटा फडकविल्या प्रकरणी शाळेतील मुख्याध्यापकांची निर्दोष मुक्तता..!! 

अहमदनगर (केडगाव) : नगर तालुक्यातील संत लक्ष्मण महाराज विद्यालय जांब कौडगाव येथील मुख्याध्यापक यांनी दिनांक २६ जानेवारी २०१७ रोजी प्रजासत्ताक दिनी तिरंगा ध्वज फडकवताना उलटा फडकविला होता.
       यामुळे तमुख्याध्यापकांच्या विरोधात नगर तालुका पोलीस स्टेशन येथे राष्ट्रध्वज अवमान प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलेला होता. या गुन्ह्याचा तपास करण्यात येऊन सदरील मुख्याध्यापक संजय महादेव पालवे यांच्या विरुद्ध नगर येथील न्यायालयांमध्ये दोषारोपपत्र पाठवण्यात आले होते.
       या प्रकरणाची सुनावणी सन 2017 पासून सुरू होती, ती आता नुकतीच पार पडली असून पूर्ण सुनावणीअंती मुख्याध्यापक श्री. संजय महादेव पालवे यांची न्यायालयाने सोमवारी निर्दोष मुक्तता केलेली आहे. 

     आरोपीच्या वतीने अॅड. गोरक्ष पालवे यांनी कामकाज पाहिले. त्यांना अॅड. राजेश खळेकर, रोहित बुधवंत, बाळकृष्ण गीते, आघाव, खेतमाळीस यांचे सहकार्य केले.   

Shirdi Express Live🎥#करीता बातम्या📰🗞️ आणि जाहिराती 🖼️साठी संपर्क @दिपक हरिश्चंद्रे (अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी )📲7350591600       
close