shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

धक्कादायक..! महाराष्ट्र शासनाच्या वसतिगृहात निकृष्ट जेवण..?


शिर्डी एक्सप्रेस लाईव्ह नेटवर्क
अकोले ।  आदिवासी भाग म्हणून सुप्रसिद्ध असलेल्या अकोले तालुक्यातील ब्राम्हणवाडा येथील महाराष्ट्र शासनाच्या अखत्यारीत चालविण्यात येणाऱ्या शासकीय आदिवासी वसतिगृहातील विद्यार्थ्यांना अतिशय निकृष्ट आणि अपुरे जेवण मिळत असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. याची संबंधित ठेकेदार आणि प्रशासनाने तातडीने दखल घेऊन विद्यार्थ्यांना न्याय द्यावा, अशी मागणी येथील नागरिकांनी केली आहे.

उपसरपंच सुभाष गायकर, सदस्य शिवाजी आरोटे आणि इतर नागरिक शहानिशा करण्यासाठी वसतिगृहात गेले असता तेथील पिडीतांनी असे सांगितले की दिवसभर आम्हांला जेवण भेटले नाही. आणि रात्री सुद्धा आतापर्यंत जेवण आले नाही, अशी धक्कादायक हकीगत विद्यार्थ्यांनी सांगितली. त्यावर चौकशी केली असता रात्री नऊ वाजेच्या सुमारास अधीक्षक यांनी विद्यार्थ्यांच्या जेवणाची सोय केली. 

तहसीलदारांनी लक्ष घालण्याची मागणी..!
सदर ही बाब अतिशय गंभीर व खेदजनक आहे.
याबत प्रकल्प अधिकारी आणि तहसीलदार यांना कळविण्यात आले असून, लक्ष घालण्याची मागणी करण्यात आली आहे.


close