shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

आडसूळ पॉलिटेक्निकचा १२ वा वर्धापन दिन उत्साहात साजरा


प्रतिनिधी :आसावरी वायकर

नगर :११/  चास येथील सौ . सुंदरबाई माणिक आडसूळ पॉलिटेक्निकचा १२ वा वर्धापन दिन उत्साहात  साजरा करण्यात आला.

 या कार्यक्रमाप्रसंगी साकेश्वर ग्रामीण विकास सेवा संस्थेचे अध्यक्ष मा. श्री अनिरुद्ध माणिक आडसूळ संस्थेच्या सेक्रेटरी सौ. लीनाताई आडसूळ  उपाध्यक्ष माननीय श्री विश्वनाथ माणिक आडसूळ टेक्निकल कॅम्पचे प्राचार्य डॉ प्रदीप एम पाटील उपप्राचार्य प्रा. के पी जाधव हे मान्यवर उपस्थित होते. 

प्राचार्य गडाख आर एस यांनी साकेश्वर ग्रामीण विकास सेवा संस्थेची स्थापना ही ग्रामीण भागातील हुशार आणि होतकर विद्यार्थी घडवण्यासाठी करण्यात आले असे सांगितले. त्याचबरोबर पॉलिटेक्निक मध्ये १२ वर्षे विद्यार्थी कसे घडले याबाबत मार्गदर्शन केले. 
संस्थेचे अध्यक्ष माननीय श्री अनिरुद्ध माणिक आडसूळ यांनी विद्यार्थ्यांशी बोलताना त्यांनी सन २०१० पासून २०२२ पर्यंत पॉलिटेक्निकच्या प्रगतीचा अहवाल विद्यार्थ्यांना सांगितला आणि आपले महाविद्यालय हे अहमदनगर जिल्ह्यातील उत्कृष्ट महाविद्यालय ठरले आहे असे प्रतिपादन केले.  यापुढे आपल्या महाविद्यालयातील विद्यार्थ्यांच्या संशोधन  वृत्तीस प्रोत्साहन  देण्यासाठी  आणि संशोधनासाठी जो  खर्च लागेल तो सर्व खर्च संस्था देईल असे आश्वासन दिले. या वर्धापनादिनानिमित्त प्राचार्य आणि सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांचे कौतुक केले. या कार्यक्रमाचे  सूत्रसंचालन प्राध्यापिका आकांक्षा म्हस्के  यांनी केले.
close