देवाची पूजा केल्याने नसीब बदलणार नाही ,ज्ञानाची पूजा करा म्हणजे तुमचं नशीब बदलेल ; विजयराव कडू
शिर्डी :-
शाळेत आल्यावर मला असे वाटले की मी आईच्या भेटीला आलो आहे,विद्यार्थी मित्रांना एकच सांगायचं आहे की देवाची पूजा केल्याने नसीब बदलणार नाही ज्ञानाची पूजा करा म्हणजे तुमचं नशीब बदलेल असा सल्ला उद्योगपती विजयराव कडू यांनी कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या जयंती प्रसंगी उपस्थित विद्यार्थ्यांना दिला, कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या विचारांची प्रेरणा घेऊन शिक्षणाचे उच्च शिखर गाठण्याचे काम विद्यार्थ्यांनी करावा असे ते म्हणाले, सावळीविहिर येथील न्यू इंग्लिश स्कूलमध्ये कर्मवीर भाऊराव पाटील यांची १३५ वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली यावेळी ते बोलत होते.
सावळीवर येथील न्यू इंग्लिश स्कूलमध्ये ढोल ताशाच्या गजरात व लेझीम पथकाच्या साह्याने कर्मवीर भाऊराव पाटील यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली, सकाळी आठ वाजता शाळेच्या विद्यार्थ्यांनी ढोल - ताशा ,लेझीम पथकाच्या साह्याने सावळीविहीर गावात सुंदर अशी कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या प्रतिमेची मिरवणूक काढण्यात आली होती.
यावेळी श्रीराम इंडस्ट्रीचे उद्योजक विजयराव कडू, राहाता कृषी बाजार उत्पन्न समितीचे उपसभापती बाळासाहेब जपे, सरपंच सौ रूपालीताई आगलावे, उपसरपंच गणेश कापसे, ग्रामविकास अधिकारी खर्डे, संतोष आगलावे,पत्रकार राजेंद्र दुनबळे, विकास जपे, राजेंद्र आगलावे, पोलीस पाटील सौ. संगीता वाघमारे, जिजाबा आगलावे, फाजगे सर, सांगळे सर, चंद्रकांत जपे, शिवाजीराव आगलावे, मुख्याध्यापक आंबेडकर सर यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
अंधकार ,अज्ञान अस्पृश्यता हे विषारी फळ आहे अज्ञान व अंधकार लोकांच्या जीवनातून काढून टाकण्याची जिद्द कर्मवीर अण्णांनी मनाची बाळगली होती असे प्रखड मत साहेबराव गायकवाड यांनी व्यक्त केले तर बाळासाहेब जपे म्हणाले की, सर्वसामान्य गरीब जनतेला शिक्षणाचे दरवाजे सर्वांसाठी उघडून शिक्षण देण्याचे महान कार्य अण्णांनी केले, तर स्वर्गीय शंकररावजी काळे साहेब यांच्या प्रयत्नामुळे सावळीविहीर येथील ही संस्था उदयास आली व त्यांच्या परिवाराच्या मदतीने सावळीविर रयत शिक्षण संस्थेची ही इमारत तयार झाली या परिवाराचे कायम सहकार्य या शाळेला लागत असून त्यांनी या शाळेला कायमस्वरूपी भरीव मदत करत असतात, त्याचप्रमाणे गेल्या ३० वर्षापासून सुप्रसिद्ध उद्योजक तथा सामाजिक कार्यकर्ते विजयराव कडू यांच्याकडूनही सातत्याने रयत शिक्षण संस्थेला कायमस्वरूपी मदत होत असते, या विद्यार्थ्यांनी आजच्या विज्ञान युगात, वातावरणात अभ्यास करून सर्वात पुढे जायचे आहे.
या स्पर्धात्मक युगात स्पर्धा खूप वाढलेली आहे त्यात आपला निभाव कसा लागेल यासाठी जास्तीत जास्त अभ्यास करून गुणवत्ता मिळवणे ही महत्त्वाची बाब आहे, त्याचप्रमाणे आपल्या आई-वडिलांची पारणे कशी फेडता येईल याचा सर्वतोपरी विचार विद्यार्थ्यांनी केला पाहिजे असे राहाता कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती बाळासाहेब जपे याप्रसंगी म्हणाले, तर इयत्ता नववी मध्ये शिक्षण घेत असलेली कु.विद्या तासकर या विद्यार्थिनीने कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या विषयी सखोल माहिती देऊन उत्कृष्ट असे मनोगत व्यक्त केले याबद्दल उपस्थिताच्या वतीने तीचे अभिनंदन करण्यात आले.
कार्यक्रमास वाळू सर, भामरे सर, डुंबरे सर,खेडकर सर, शेख सर, भोये सर, खान सर,, म्हस्के सर, काळे सर,गोरे,सर ,सर्व शिक्षक शिक्षिका कर्मचारी वृंद यांचे सहकार्य लाभले.

