अमरावती - आरोग्य व कुटुंब कल्याण प्रशिक्षण केंद्र अमरावती येथे 25 ऑगस्ट ते 08 सप्टेंबर दरम्यान साजरा होत असलेल्या 37 व्या राष्ट्रीय नेत्रदान पंधरवाड्याचे औचित्य साधून संस्थेचे प्राचार्य मा.डॉ.डवले सर यांच्या मार्गदर्शनात दि.02 सप्टेंबर 2022 रोजी बहुउद्देशीय आरोग्य सेवकांची डॉ.नरेंद्र भिवापुरकर अंध विद्यालय अमरावती येथे क्षेत्रिय भेट देण्यात आली.
तेथील अंध विद्यार्थ्यांसोबत हितगुज केल्यानंतर त्यांच्या पुढील समस्या आणि आव्हाने यांची तीव्रता लक्षात आली. परंतु त्याचबरोबर त्यांच्यातील कलागुणांचा होणारा विकास यामध्ये सदर विद्यालयाचा व तेथील कर्मचाऱ्यांचा सिंहाचा वाटा आहे.
जे अंध विद्यार्थी शस्त्रक्रिया करून सृष्टी पाहू शकतात अशा पात्र विद्यार्थ्यांची तांत्रिकदृष्ट्या तपासणी करणे व जे पात्र नेत्रदान इच्छुक लोक आहेत व ज्यांनी रितसर नेत्रदानासाठी नोंदणी केली आहे त्यांच्या मरणोत्तर हे कार्य त्यांच्या नातेवाईकांनी पुढाकार घेऊन पूर्ण करावे म्हणजे हे नेत्रदान पंधरवाड्याचे यश असेल.
या राष्ट्रीय नेत्रदान पंधरवाडानिमित्त क्षेत्रिय भेट यशस्वी करण्यासाठी आरोग्य पर्यवेक्षक तथा प्रशिक्षण समन्वयक श्री.डोंगरे सर तसेच आरोग्य व कुटुंब कल्याण प्रशिक्षण केंद्र अमरावती येथील अधिकारी,प्रशिक्षणार्थी व सर्व कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेऊन सहकार्य केले.

