shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

नगर-मनमाड राज्यमहामार्ग वरील खड्ड्याने घेतला महिलेचा बळी..!!

शिर्डी एक्स्प्रेस लाईव्ह वृत्तसेवा अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी- दिपक हरिश्चंद्रे.
शुक्रवार दिनांक ०९ सप्टेंबर २०२२ 

नगर-मनमाड राज्यमहामार्ग वरील खड्ड्याने घेतला महिलेचा बळी..!!

राहुरी : नगर-मनमाड राज्य महामार्गाची अत्यंत दूरवस्था झाली आहे.गुरुवार, दि.८ सप्टेंबर रोजी सकाळच्या दरम्यान मीराबाई तागड या खड्ड्यांमुळे मोटरसायकलवरून पडल्या आणि पाठीमागून येणाऱ्या कंटेनरच्या चाकाखाली येऊन जागेवर ठार झाल्या. त्यांचे पती गंभीररीत्या जखमी झाले आहेत.राहुरी तालुक्यातील डिग्रसचे रहिवासी असलेले राधाकृष्ण तागड व त्यांची पत्नी मीराबाई तागड हे सकाळी सातच्या दरम्यान त्यांच्या दुचाकीवरून डिग्रस येथून राहुरीकडे येत होते.
नगर- मनमाड राज्य महामार्गावर डिग्रस फाटा येथे दुचाकी रस्त्यातील खड्ड्यात आदळली.तेव्हा मीराबाई तागड रस्त्यावर पडल्या. त्याचवेळी नगरहून राहुरीच्या दिशेने येत असलेल्या कंटेनरच्या चाकाखाली येऊन ३८ वर्षीय मीराबाई यांचा जागीच मृत्यू झाला.
त्यांचे पती राधाकृष्ण तागड गंभीर दुखापत झाल्याने त्यांना नगर येथे उपचारासाठी पाठविण्यात आले.
 
        चार दिवसांपूर्वीच राहुरी येथील अजय बोरूडे या २८ वर्षीय तरुणाचा रस्त्यावरील खड्डा चुकविण्याच्या नादात अपघात होऊन तो मयत झाला. ही घटना ताजी असतानाच आज पुन्हा नगर-मनमाड रस्त्याने मीराबाई तागड या महिलेचा बळी गेला.

मयत मीराबाई तागड यांच्या पश्चात तीन मुली,एक मुलगा, पती,सासू असा परिवार आहे.

Shirdi Express Live🎥#करीता बातम्या📰🗞️ आणि जाहिराती 🖼️साठी संपर्क @दिपक हरिश्चंद्रे (अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी )📲7350591600       
close