shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

फ-या व लंम्पी रोगाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी तात्काळ उपयोजना करा - सरपंच जनार्दन घोगरे पाटील

मुख्यमंत्र्यांसह पशुसंवर्धनमंत्री व विरोधीपक्ष नेत्यांकडे निवेदनाद्वारे मागणी.

लोणी खुर्द: अहमदनगर जिल्ह्यातील जनावरांवर असलेला फ-या व लंम्पी रोगाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी तात्काळ उपाययोजना होण्यासाठी लोणी खुर्द चे सरपंच जनार्दन घोगरे यांचे पशुसंवर्धन मंत्री राधाकृष्ण विखे यांना ई- मेल द्वारे निवेदन दिले असुन त्या निवेदनाच्या प्रती राज्याचे मा. मुख्यमंत्री, मा. अजित पवार विरोधीपक्ष नेते, मा बाळासाहेब थोरात विधीमंडळ पक्षनेते, जिल्हाधीकारी अ.नगर यांनाही ई- मेल द्वारे पाठवल्याची माहिती घोगरे यांनी दिली.

     या निवेदन सरपंच घोगरे म्हणाले की, जिल्ह्यात जनावरांवर  मोठे महासंकट कोसळले असुन फ-या व लंम्पी रोगाने मोठे थैमान घातलेले आहे. या जनावरांवरील आजाराने शेतकरी मोठ्या संकटात सापडला असुन चिंतेत आहे.महाराष्ट्रात सर्वात मोठा आमच्या लोणी खुर्द गावातील जनावरांचा बाजार फ-या व लंम्पी रोगाच्या फैलावामुळे बंद ठेवण्यात आला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान होत आहे.जनावरांवर आलेला फ-या व लंम्पी रोगाचा फैलाव रोखण्यासाठी तातडीने लसीकरण होणे क्रमप्राप्त आहे. अद्याप लसीकरणासाठी लस उपलब्ध नाही त्यामुळेच शेतकऱ्यांमध्ये मोठी चिंताजनक परिस्थिती निर्माण झाली आहे.

         ग्रामीण भागातील बहुतांश शेतकऱ्यांची संसार हे गाय, म्हैस यांच्या दुध व्यवसायावर आहे. जर या आजाराचे थैमान रोखले नाही तर अनेक कुटुंब उध्वस्त होणार असुन ही परिस्थिती गांभीर्याने दखल घेणे गरजेचे आहे. तरी जनावरांवर असलेल्या फ-या व लंम्पी रोगाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी तात्काळ लसीकरणासारख्या उपाययोजना राबवण्यात याव्या ज्या शेतकऱ्यांच्या जनावरांवर फ-या व लंम्पी आजाराने ग्रस्त आहे त्यांना शासनामार्फत औषधोपचार करावेत तसेज ज्या शेतकऱ्यांचे जनावरे फ-या व लंम्पी रोगाने दगावलेले आहे त्यांचे तात्काळ पंचनामे करुन त्यांना नुसकान भरपाई देण्याचे आदेश व्हावे अशी मागणी निवेदनाद्वारे सरपंच जनार्दन घोगरे यांनी केली आहे.
close