shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

माजी आ.भानुदास मुरकुटे यांचा वाढदिवस विविध उपक्रम राबवून आगळ्या वेगळ्या पद्धतीने साजरा..!

शौकतभाई शेख श्रीरामपूर:
श्रीरामपूर तालुक्याची कामधेनू असलेल्या अशोक सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन माजी आ.भानुदास मुरकुटे यांनी आपल्या वाढदिवशी कोणतेही प्रदर्शन न करण्याचे तसेच हारतुरे, बुके, फ्लेक्स बोर्ड आदिंना फाटा देण्याचे आवाहन केले होते. या आवाहनास प्रतिसाद देत भामाठाण येथील लोकसेवा विकास आघाडीचे कार्यकर्ते किशोर बनसोडे मित्र मंडळाचे वतीने श्रीरामपूर शहरातील श्री गुरुमाऊली सेवाभावी संस्था संचालित माऊली वृद्धाश्रमातील वृद्धांना माजी आ.श्री.मुरकुटे यांचे उपस्थितीत अन्नदान सेवा करून आगळ्या वेगळ्या पद्धतीने वाढदिवस साजरा करण्यात आला. 

यावेळी भामाठाण गावचे किशोर बनसोडे, रामनाथ सांगळे, राजु बनसोडे, दादाभाऊ गोरे, शिवनाथ आव्हाड, मधुकर बनसोडे, सुनील बनसोडे, अशोक मुठे, आजीनाथ वाकचौरे, ताहेर भाई, मनोहर भोसले, काकासाहेब बनसोडे, तात्यासाहेब वर्पे आदी उपस्थित होते. 
पढेगाव येथील प्राथमिक शाळेत लोकसेवा विकास आघाडी व नेताजी सोशल फाउंडेशन, पढेगाव यांच्यावतीने वाढदिवसानिमित्त शालेय विद्यार्थ्यांना बिस्कीट पुड्यांचे वाटप करण्यात आले. 

त्याप्रसंगी अशोक कारखान्याचे संचालक वाय.जी. बनकर, पढेगाव सोसायटीचे व्हा.चेअरमन अजय लिप्टे, प्रल्हाद बनकर, अविनाश  लिप्टे, अशोक कांदळकर, भगवान तोरणे, अतुल लबडे, आदित्य बनकर व सर्व शिक्षक वृंद उपस्थित होते. तसेच वडाळामहादेव येथील रयत शिक्षण संस्थेच्या महादजी शिंदे वसतिगृह येथे मुलांसमवेत श्री.मुरकुटे यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला.
close