चंद्रघंटा ..
प्रसादे तनुये महयं
चंद्रघण्टति विश्रुता
मंगलमय ती भक्ता
काल वाटे विकृता
नवरात्र तृतीयदिनी
चंद्रघंटा अवतारात
दुर्गादेवी सिंहारुढ
ठसली ती अंतरात
घंटेसम ती चंद्रकोर
सुशोभित मुकूटात
म्हणूनचं चंद्र घंटा
माते तुज म्हणतात
सुवर्ण कांती शरीरा
सुगंध ये परिसरात
स्फुल्लिंग फुलतात
आरती गाता सुरात
रुद्ररुप दिसे असूरा
धडकी भरे ऊरात
निर्भयता सबलता
उर्जा उत्पन्न नरात
विविधआयुधे शोभे
महा माये दहा हात
सप्तशती पाठहोती
शांती नांदते घरांत
2)
नीलवर्ण..
( चंद्रघण्टा )
चंद्र घण्टा महाशक्ती
प्रिय तिला नील वर्ण
निलांबरा समान करे
स्नेह ममता विस्तीर्ण
श्रीसुक्तपठण करीत
फुले अर्पावी गोकर्ण
सप्तशती सार मनन
स्तवनगायन संकीर्ण
देवी मा लोभसवाणी
रुपेरीकांती तेजस्वर्ण
अष्टभुजा शस्त्रसज्ज
भक्तास रक्षीते संपूर्ण
मनातून श्रध्दा ठेवता
इच्छा होती परिपूर्ण
नीलकंठ पति सतीचा
राक्षसा करितो जीर्ण
भक्तीचा नील सागर
भरता काठोकाठ पूर्ण
फुटेल पालवी हिरवी
असूनि वल्ली निष्पर्ण
- हेमंत मुसरीफ, पुणे
9730306996.
www.kavyakusum.com

