shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

रेशनकार्ड धारकांना दिवाळीसाठी चार जिन्नसांचा जादा संच मिळणार फक्त १०० रुपयात...!

शिर्डी एक्स्प्रेस वृत्तसेवा
मुंबई :-  काल दि.४ आक्टोबर २०२२ रोजी राज्य शासनाच्या वतीने एक शासननिर्णय काढण्यात आला. 

 दिवाळीच्या निमित्ताने राज्यातील शिधापत्रिकाधारकांना जादा चार शिधा जिन्नसाचा दिवाळी पॅकेज केवळ शंभर रुपयात देण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. 

बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते.  


असे असेल  दिवाळी सणाचे  पॅकेज..

यावेळी चार सिधाजिन्नसाचा संच जादा मिळणार ते पुढील प्रमाणे..

 राज्यातील सार्वजनिक वितरण व्यवस्थेअंतर्गत अंत्योदय अन्न योजना, प्राधान्य कुटूंब तसेच औरंगाबाद व अमरावती विभागीय कार्यालयातर्गत येणार्या सर्व जिल्हे व नागपूर विभागातील वर्धा अशा १४ शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्ह्यातील एपिएल (केसरी) शेतकरी सिधापत्रिका धारकांना प्रत्येकी प्रती एक किलोच्या प्रमाणात रवा, चणाडाळ, साखर व एक लिटर पामतेल याचा समावेश असेल. 

सदर योजना मर्यादित दिवसांसाठी असून त्याची पुरवठा विभागावर जबाबदारी असणार आहे.

राज्यातील १ कोटी ७० लाख कुटुंबांना म्हणजेच सुमारे सात कोटी लोकांना याचा प्रत्यक्ष लाभ होणार आहे. हा संच फक्त एक महिन्याच्या कालावधीकरिता देण्यात येऊन त्याचे वितरण ई-पॉस प्रणालीद्धारे करण्यात येईल. यासाठी येणाऱ्या एकूण ५१३ कोटी २४ लाख खर्चास देखील मान्यता देण्यात आली. या शिधावस्तूंचा संच दिवाळी पूर्वी वाटप व्हावा, त्याचप्रमाणे कुठल्याही तक्रारी येऊ नये, याची खबरदारी अन्न व नागरी पुरवठा विभागाने घेण्याच्या सूचना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शासननिर्णयाद्वारे
 दिल्या आहेत.
close