shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

नगरपरिषद प्रशासनाचा पराक्रम !राहाता शहरात डासांचा विक्रम !!

३५ हजार लोकसंख्या असलेल्या नगरपरिषदेचा कारभार खूपच न्यारा !

अन् एकच फोगिंग मशीन त्यावरच संपूर्ण राहाता शहराचे डास मारा !!


राहाता समीर बेग:
येथील नगरपरिषदेचा अजब- गजब कारभार पाहून जणू शहरात डासांनी देखील हैदोस मांडला असल्याचे बघावयास मिळत आहे, डासांमुळे होणाऱ्या विविध आजारांनी शहरातील दवाखाने गच्च भरलेले दिसून येत आहेत, परंतु शहरातील नगरपरिषद प्रशासन आणि  आरोग्य विभाग गाढ झोपेत असल्याचे चित्र निर्माण झाले आहे ,३५ हजार लोकसंख्या व २२ हजार मतदार असलेल्या नगरपरिषदेत एकच फोगिंग मशीन असून त्यावरच संपूर्ण शहराची जबाबदारी,कारण दुसरं फोगिंग मशिन घ्यायला आर्थिक तरतूद नसणार हे स्पष्टच,मग लाखो रुपये कर गोळा करून, आरोग्य कर घेऊन तो जातो तरी कोठे ? असा खडा प्रश्न नागरिक उपस्थित करीत आहेत. याविषयी आजतगायत अनेक निवेदने देऊन देखील कोणतीही उपाय योजना करताना नगरपरिषद प्रशासन दिसून येत नाही,येथील रहिवासी भागांसह विविध भागातील रस्त्यांवरील खड्ड्यांमध्ये पावसाचे पाणी साचून डबके तयार झाले आहेत. 

शिवाय पाण्याने बऱ्याच ठिकाणी कचरा कुजल्याने डासांची उत्पत्ती वाढली आहे. त्यामुळे आरोग्याच्या समस्या निर्माण होत आहे. औषधे आणि धूर फवारणी करण्याची मागणी नागरिकांनी केली परंतु नगरपरिषदेचे अधिकारी कर्मचारी याकडे कानाडोळा करत वेळ मारुन नेण्याचा प्रयत्न करताना दिसुन येत आहेत,गेल्या काही दिवसांपासून शहरात सतत सुरू असलेल्या पावसाने रस्त्यांची चाळण झाली असून, ठिकठिकाणी खड्ड्यांचे साम्राज्य निर्माण झाले आहे. त्यात भूमिगत गटारीचे सुरू असलेल्या कामांसाठी चांगले रस्ते फोडून केलेले खड्डे वेगळेच. यात पावसाचे मोठ्या प्रमाणावर पाणी साचून डबके तयार झाले आहेत. असे हे डबके आरोग्याच्या समस्या निर्माण होण्यासाठी निमंत्रण देत आहे. साचलेले पाणी आणि विविध ठिकाणी पडून असलेला कचरा यावर पावसाचे पाणी पडून कचरा कुजला आहे.असे दोन्ही ठिकाण डास मच्छर उत्पत्तीचे केंद्र ठरत आहे. डासांमुळे आजारी पडण्याचे प्रमाण वाढत आहे. त्यामुळे शहरातील प्रत्येक लहान- मोठे क्लिनिक, रुग्णालय सध्या रुग्णांनी गच्च भरलेले असल्याचे दिसून येत आहे. इतकेच नाही तर कुजलेल्या कचऱ्यामुळे डासांचे प्रमाण तर वाढलेच आहे. शिवाय परिसरात दुर्गंधी पसरली आहे. रहिवाशांना यामुळे आरोग्याचा त्रास जाणवत आहे. डासांपासून बचावासाठी पावसाळी गारठ्याच्या वातावरणातही नागरिकांना फॅन लावण्याची वेळ आली आहे. तर काहींनी मच्छरदाणीचा वापर सुरू केला आहे. 

मी मारल्यासारखे करतो तु रडल्यासारखे कर या म्हणीप्रमाणे

नगर पालिका अधिकारी म्हणतात संबंधित बाबी तात्काळ उचित कामे करण्याचे आम्ही आदेश दिलेत,आणि कर्मचारी म्हणतात आम्ही काही करु शकत नाही कारण एकच मशीन आहे आमच्याकडे, जितके आम्हाला शक्य होईल तीतके आम्ही करतो, यापुढे तर आमच्या हातात काहीच नाही...! 

यामुळे यापुढे आणखी भयावह परिस्थिती निर्माण होऊ नये यासाठी औषध फवारणी करणे खूप गरजेचे आहे.तसेच, वेळोवेळी धूर फवारणी करावी. डास उत्पत्ती केंद्र असलेले खड्डे त्वरित बुजविण्यात यावे, ​अशी मागणी नागरिकांकडून होत आहे."खड्ड्यांमध्ये साचलेल्या पाण्यासह ड्रेनेजच्या सांडपाण्यात गटारीमध्ये औषध फवारणी करण्यात यावी. रस्त्यावर पडलेला पाळापाचोळा कचरा कुजल्यानेही डासांचे प्रमाण वाढत आहे. अशा कचऱ्याचा योग्य पद्धतीने विल्हेवाट लावण्यात यावी अशी मागणी शहरातील त्रस्त नागरिकांकडून होत आहे.
close