shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

व्याहाळी केंद्राची शिक्षण परिषद उत्साहात संपन्न

व्याहाळी केंद्राची शिक्षण परिषद उत्साहात संपन्न
इंदापूर प्रतिनिधी: दिनांक ३० सप्टेंबर २०२२ रोजी व्याहाळी केंद्राची सप्टेंबर २०२२ ची शिक्षण परिषद जिल्हा परिषद प्राथमिक शाळा व्याहाळी येथे मोठ्या उत्साहात संपन्न झाली.शिक्षण परिषदेची सुरुवात सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमा पूजनाने झाली.सर्व शिक्षकांनी विनोबा अँपद्वारे पूर्वचाचणी सोडवली.नंतर सुलभक श्री भारत ननवरे सरांनी FLS सर्वेक्षण सादरीकरण,भाषा उपघटक आणि गटकार्य सादरीकरण यावर चर्चात्मक मार्गदर्शन केले.नंतर सुलभक श्री सतेश भोंग सरांनी गणित उपघटक व गटकार्य सादरीकरण, विद्यांजली पोर्टल-शाळा नोंदणी यावर मार्गदर्शन केले.नंतर सर्वांनी उत्तरचाचणी सोडवली.सर्वांनी चर्चेत सहभाग घेतला.शिक्षण परिषदेस निमगाव बिट चे विस्ताराधिकारी श्री सुनील मुगळे साहेब व केंद्रप्रमुख श्री संभाजी आजबे साहेब यांनी भेट देऊन मार्गदर्शन केले.चहा/नाश्त्याची सोय मारकडवस्ती शाळेच्या वतीने करण्यात आली.शिक्षण परिषद हसतखेळत पार पडली.शिक्षण परिषदेस केंद्रातील ४३ शिक्षक उपस्थित होते.आभार शिक्षक पतसंस्थेचे माजी चेअरमन श्री किरण म्हेत्रे यांनी मानले.
close