प्रतिनिधी : संजय वायकर
अहमदनगर : ८ / सेवार्थ प्रतिष्ठाण निर्मलनगर, पोलिस कॉलनी अहमदनगर येथे शारदीय नवरात्रोत्सव निमित्त सालाबाद प्रमाणे या वर्षी देखील सेवार्थ प्रतिष्ठाण निर्मलनगर आयोजित व मा . आमदार संग्राम भैय्या जगताप यांच्या उपस्थितीत कोजागिरी निमित्त ९ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ७ वाजता भंडाऱ्याचे (महाप्रसादाचे ) आयोजन केलेले आहे . त्यानंतर रात्री दुध वाटप ही केले जाणार आहे .
तरी परिसरातील सर्व नागरिकांनी देवी भक्तांनी या महाप्रसादाचा लाभ घ्यावा असे प्रतिष्ठाणचे संस्थापक वैभव पोकळे यांनी सांगितले आहे .

