shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

शिंदेंच्या आत्मदहनाची प्रशासनाकडून गंभीर दखल ; पोलीस अधिकाऱ्यांच्या तडकाफडकी बदल्या


 प्रतिनिधी : संजय वायकर

नगर : १४ /  नगर तालुक्यातील गुंडेगाव येथे मोठया प्रमाणात अवैध धंदे चालू असून या बाबत अनेक तक्रारी करण्यात आल्या होत्या परंतु पोलीस आणि दारू विक्री करणारे यांच्यात समेट असल्याने दारू बंद होत नसल्याचे लक्षात येताच सामाजिक कार्यकर्ते भाऊसाहेब शिंदे यांनी प्रशासनास आत्मदहन करण्याचा इशारा दिला होता . याची मा . मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मा .उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गंभीर दखल घेऊन गुंडेगावातील अवैध ( दारू ) विक्री ही तात्काळ बंद करण्याचे आदेश देण्यात आले आणि तात्काळ अहवाल मागवला . परिणामी प्रशासकीय पातळीवर हालचालींना जोरदार वेग आला . भाऊसाहेब शिंदेनी थेट पोलीसच हप्ते घेत असल्याचा आरोप केला होता याची गंभीर दखल घेऊन अनेक पोलीस अधिकाऱ्यांच्या तडकाफडकी बदल्या करण्यात आल्या . 

बुधवार दि . १२ रोजीच्या मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री जिल्हाअधिकारी,पोलीस अधीक्षक, राज्य उत्पादन शुल्क यांच्या आदेशानुसार नगर तालुकयाचे पोलीस प्रमुख पी. आय. राजेंद्र सानप साहेब व राज्य उत्पादन शुल्क चे प्रमुख अधिकारी यांनी भाऊसाहेब शिंदे यांची गुंडेगाव येथे जाऊन भेट घेतली व आपण आत्मदहन करू नये अशी विनंती केली . गुंडेगावातील अवैध (दारू )विक्री 100% बंद करण्याचे आश्वासन दिले आहे तसेच अनेक पोलीस अधिकारी यांच्या बदल्या केल्या असल्याचे सांगितले .

बेकायदेशीर दारू विक्री करणाऱ्यास नोटीसा दिले आहेत . वेळोवेळी सहकार्य करू असे प्रशासनाच्या वतीने सांगितले व भाऊसाहेब शिंदे यांनी केलेल्या सर्व मागण्या मान्य केल्यानंतर आत्मदहना चा इशारा तूर्तास मागे घेत असल्याचे सामाजिक कार्यकर्ते भाऊसाहेब शिंदे यांनी सांगताच प्रशासनाने सुटकेचा निश्वास सोडला .
close