प्रकाश मुंडे | बीड जिल्हा प्रतिनिधि :-
बीड जिल्ह्यातील ३३ केव्हीच्या-प्रस्तावित २० उपकेंद्रांसाठी जागेची पाहणी सुरु झाली आहे. यापैकी सर्वाधिक म्हणजेच सहा उपकेंद्र एकट्या केज विधानसभा मतदार संघात असून त्यासाठी आ.नमिता मुंदडा यांनी सातत्याने पाठपुरावा केला होता.विजेची मागणी वाढल्याने आहे त्या उपकेंद्रांवर ताण येऊन कमी दाबाने विद्युत पुरवठा होतो आहे.याचा विपरीत परिणाम शेती आणि उद्योगधंद्यांवर पडत होता.
त्यामुळे केज मतदार संघातील विविध ठिकाणी नव्या विद्युत उपकेंद्रांची उभारणी करण्यासाठी आ.नमिता मुंदडा मागील अडीच वर्षापासून सातत्याने प्रयत्नशील होत्या.त्यांच्या प्रयत्नांना यश आले असून प्रस्तावित सहा विद्युत केंद्रांसाठी मगरवाडी फाटा,पोखरी रोड, डिघोळआंबा,सोमनाथ बोरगाव,पाटोदा देवळा आणि येल्डा या सहा ठिकाणी जागेची पाहणी करण्यास सुरुवात झाली आहे.या सहा केंद्रासह बीड जिल्ह्यातील एकूण वीस उपकेंद्रे आरडीएसएस प्रणालीत प्रस्तावित आहेत.
त्यामुळे जागा पाहणी सुरु झाल्याने ही विद्युत उपकेंद्रे उभारण्याची प्रक्रिया मार्गी लागली असून लवकरच कमी दाबाच्या विजेचा प्रश्न सुटणार आहे.दरम्यान,केज तालुक्यातील उंदरी येथील ३३ केव्ही उपकेंद्र एसीएफ योजनेत समाविष्ट करण्यात आले असून फिजी- बिलीटीसाठी महापारेषणच्या मुंबई मुख्य कार्यालयात प्रस्ताव पाठविण्यात आला असल्याचे आ.नमिता मुंदडा यांनी सांगितले आहे.
आ. नमिताताई मुंदडा व भाजपचे ज्येष्ठ नेते नंदकिशोर मुंदडा यांचा केज मतदार संघातील विकासात्मक कामासाठी सातत्याने पाठपुरावा चालू आहे .त्यामुळे केज व अंबाजोगाई तालुक्यातील नागरिक मोठ्या प्रमाणात समाधान व्यक्त करताना दिसत आहेत.


