shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

शिंदेंना करायचीय गुंडेगावात दारूबंदी ; आत्मदहनाचा इशारा देताच प्रशासकीय पातळीवर हालचालींना वेग



प्रतिनिधी : संजय वायकर

अहमदनगर : ३ /  नगर तालुक्यातील गुंडेगाव येथे मोठया प्रमाणात अवैध धंदे चालू असून याबाबत अनेक तक्रारी करण्यात आल्या होत्या. परंतु पोलीस आणि दारू विक्री करणारे यांच्यात समेट असल्याने दारू बंद होत नसल्याचे लक्षात येताच सामाजिक कार्यकर्ते भाऊसाहेब शिंदे यांनी प्रशासनास आत्मदहन करण्याचा इशारा दिला आहे .

 गुंडेगावातील अवैध दारू विक्री बंद न केल्यामुळे युवा पिढी व अनेकांचे संसार मोडकळीस आले आहेत . त्याचे भावी जीवन अंधकारमय होत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे .मात्र गुंडेगाव सारख्या ग्रामीण भागात अवैध धंदे राजरोज पणे खुले आम सुरु असल्याने ते तात्काळ बंद न केल्यास गुरुवार दि . १३ ऑक्टोबर  रोजी आत्मदहन करणार असल्याचे निवेदन युवा सामाजिक कार्यकर्ते भाऊसाहेब शिंदे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अहमदनगर चे पालकमंत्री राधाकृष्ण विखे, जिल्हाअधिकारी राजेंद्र भोसले, पोलीस अधीक्षक यांच्याकडे दिले . 

 यावर पालकमंत्री मा .विखे साहेब व अहमदनगर जिल्हाधिकारी यांनी ताबडतोब कारवाईचे आदेश दिले असल्याचे समजते .
close