आज इंदापुरात जल्लोष दांडियाचा नवरात्र उत्सवानिमित्त रोटरी क्लब ऑफ इंदापूर च्या वतीने आयोजन.
मनोरंजनासाठी बधाई आर्केस्ट्रा पुणेचे आयोजन. तर सर्व रोट्रीयन घेणार दांडिया चा आनंद.
इंदापूर प्रतिनिधी: इंदापूर तालुक्यातील इंदापूर शहराचे वैभव आणि सामाजिक बांधिलकी जपणारे रोटरी क्लब ऑफ इंदापूर डिस्ट्रिक्ट ३१३१ क्लब नंबर ८४०८३ यांच्यावतीने नवरात्र उत्सवानिमित्तआज सायंकाळी ६ वाजता शहा सांस्कृतिक भवन इंदापूर येथे भव्य दांडिया जल्लोष २०२२ चे आयोजन करण्यात आले असून यामध्ये मनोरंजनासाठी बधाई आर्केस्ट्रा पुणे फूड फेस्टिवल सह आयोजित करण्यात आले असल्याची माहिती रोटरी क्लब ऑफ इंदापूरचे अध्यक्ष नरेंद्र गांधी यांनी दिली आहे.
रोटरी क्लब ऑफ इंदापूरच्या सन २०२२-२३ या वर्षासाठी सर्व सभासदांनी मिळून अध्यक्ष म्हणून नरेंद्र गांधी यांची निवड केली व सेवेची संधी दिली त्याबद्दल त्यांनी सभासद व पदाधिकाऱ्यांचे आभार व्यक्त केले . अध्यक्ष पदाचा पदभार स्वीकारल्यापासून सर्व सहकाऱ्यांच्या माध्यमातून आत्तापर्यंत इंदापूर तालुक्यातील विविध ३ शाळांमधील गरीब व होतकरू विद्यार्थ्यांना शालेय गणवेश वाटप केले. दोन शाळांमध्ये विद्यार्थ्यांना शुद्ध पाणी पिण्यासाठी मिळावे म्हणून पाण्याचे आर.ओ. मशीन बसवले. डॉक्टर्स डे साजरा करून इंदापूर मधील डॉक्टरांचा सन्मान सोहळा आयोजित केला. त्यानिमित्त इंदापूर येथील आय. एम. ए .हॉल परिसरात वृक्षारोपण केले .पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी वृक्षारोपण ही काळाची गरज ओळखून गोखळी येथील वनक्षेत्र परिसरात मोठ्या प्रमाणावर वृक्षारोपण केले. रोट्रीयन उदय शहा यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन करून २०४ बाटल्या रक्त संकलन केले. ग्रामीण भागातील खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी व त्यांना योग्य प्रशिक्षण व मार्गदर्शन मिळवण्यासाठी स्माईल स्पोर्ट्स बंगलोर व रोटरी क्लब पुणे सहवास यांच्या सहकार्याने होतकरू खेळाडूंना प्रशिक्षण शिबिराचे आयोजन केले. श्री संत जगद्गुरु तुकाराम महाराज यांच्या पालखी सोहळ्यातील वारकरी भाविकांना वर्तमानपत्राचे वाटप केले. इंदापूर या ठिकाणी पालखी मुक्कामातील पायी वारी करणाऱ्या भाविकांची संत चरण सेवा केली. दिनांक १ ऑक्टोबर २०२२ पासून रोटरी क्लब ऑफ इंदापूर व स्मीयर लॅब यांच्या संयुक्त विद्यमाने इंदापूर शहरांमध्ये मोफत रक्तातील साखर तपासणी सुविधा सर्व नागरिकांसाठी उपलब्ध करून दिली आहे. हे सामाजिक कार्य करत असताना रोटरीतील सर्व पदाधिकारी व सभासदांचे मोलाचे सहकार्य लाभले आहे. यावर्षी क्लब मध्ये ९ नवीन सदस्यांची भर पडली असून प्रत्येक रोट्रियन यांचा वाढदिवस हा अतिशय उत्साहाने व त्यांना अध्यक्ष म्हणून माझ्या वतीने भेटवस्तू देऊन साजरा करतो. तसेच आज शाळा सांस्कृतिक भवन इंदापूर येथे दिनांक ८ ऑक्टोबर २०२२ रोजी सायंकाळी ६ वाजता नवरात्र उत्सवानिमित्त दांडिया जल्लोष २०२२ बधाई आर्केस्ट्रा पुणे, फूड फेस्टिवल सह या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.पुढील काळातही असेच सामाजिक कार्य माझ्यातून रोटरी सभासदांच्या सहकार्याने होईल अशी माहिती रोटरी क्लब ऑफ इंदापूरचे अध्यक्ष नरेंद्र गांधी यांनी दिली.

