वनगळी पारेकरवस्ती येथे अखंड हरिनाम सप्ताह व ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्यास प्रारंभ.
इंदापूर प्रतिनिधी: इंदापूर तालुक्यातील वनगळी पारेकर वस्ती या ठिकाणी सालाबाद प्रमाणे याही वर्षी अखंड हरिनाम सप्ताह व ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्याचे आयोजन समस्त ग्रामस्थ वनगळी पारेकरवस्ती यांच्या वतीने दिनांक ५ ऑक्टोबर ते १० ऑक्टोबर पर्यंत आयोजन करण्यात आले आहे.
यामध्ये पहाटे ४ ते ६ काकड आरती, ७ ते ९ ज्ञानेश्वरी पारायण, ११ ते १ गाथा भजन, दुपारी १ ते ४ भोजन व विश्रांती, सायंकाळी ६ ते ७ हरिपाठ, रात्री ९ ते ११ कीर्तन व नंतर जागर अशा पद्धतीने या कार्यक्रमाचे नियोजन केले आहे.
या कार्यक्रमांमध्ये नवनाथ महाराज मारकड कौठळी, मधुकर महाराज गिरी नानज, मोहन महाराज बेलापूरकर, मारुती महाराज शेजाळ, अमोल महाराज सूळ मोरोची, यांचे रात्री ९ ते ११ कीर्तन होणार आहे.
तसेच या कार्यक्रमासाठी अन्नदाते म्हणून शंकर बलभीम मारकड, मधुकर सर्जेराव पारेकर, सोमनाथ गोविंद पारेकर, सुरेश धुळा भिसे, गणेश सुखदेव पारेकर, दीपक विलास पाटील, दत्तू आबा पारेकर पाटील, माणिकराव सिताराम पाटील, पोपट बाबुराव पारेकर, चौरंगनाथ आनंदराव पारेकर, अनिल मारुती पारेकर ,हिरालाल शंकर पारेकर, सुदाम सर्जेराव पारेकर, धनाजी बाबुराव पारेकर, हरिश्चंद्र सदाशिव पारेकर, बाळू निवृत्ती पारेकर, शरद नामदेव पारेकर या अन्नदात्यांकडून अन्नदानाची सेवा या कार्यक्रमात होणार आहे.
तर सोमवार दिनांक १० ऑक्टोबर रोजी १० ते १२ यावेळी संतोष महाराज कांबळे राजवडी यांचे काल्याचे किर्तन होणार असून यानंतर जेष्ठ नागरिक मंजुळाबाई व श्री दत्तू पारेकर पाटील यांच्या हस्ते दहीहंडीचा कार्यक्रम होणार असून यानंतर महाप्रसादाचे आयोजन वनगळी पारेकरवस्ती समस्त ग्रामस्थ यांच्या वतीने करण्यात आले आहे.

