इंदापूर प्रतिनिधी: रयत शिक्षण संस्थेच्या सौ. कस्तुराबाई श्रीपती कदम विद्यालय व जुनिअर कॉलेजमध्ये शारदीय नवरात्र उत्सवानिमित्त पारंपारिक सणांची ओळख व्हावी म्हणून भोंडला कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. विद्यार्थ्यांना आपल्या संस्कृतीची माहिती व्हावी व हा संस्कृतीचा वारसा जपला जावा हा उद्देश असे कार्यक्रम साजरे करणे मागे असतो. या कार्यक्रमात विद्यालयातील जवळपास साडेतीनशे मुलींनी सहभाग घेतला. विद्यालयाचे प्राचार्य भास्कर वाबळे व पर्यवेक्षक विजय शिंदे यांच्या हस्ते पूजन झाले. भोंडला खेळाची पारंपरिक गाणी सादर करून मुलींनी नृत्य केले. त्यानंतर मुलींनी आणलेली खिरापत ओळखण्याचा कार्यक्रम घेण्यात आला व ती खिरापत सर्वांना वाटण्यात आली.सांस्कृतिक विभागांतर्गत हा कार्यक्रम घेण्यात आला. अश्विनी भिसे, अर्चना अनारसे, रोहिणी मोहिते, संगीता गुरव, प्रिया भोंग,वर्षा नागणे, सुषमा अंदुरे,पुष्पा लोंढे या महिला शिक्षकांनी या कार्यक्रमाचे नियोजन केले.
- मुख्यपान
- 🎌 महाराष्ट्र
- _अहमदनगर
- __शिर्डी
- _पुणे
- _जालना
- _सांगली
- _नांदेड
- _नंदुरबार
- _गडचिरोली
- _कोल्हापूर
- _सातारा
- _गोंदिया
- _रत्नागिरी
- _रायगड
- _जळगाव
- _अमरावती
- _सिंधुदुर्ग
- _बीड
- _लातूर
- _नाशिक
- _नागपूर
- _सोलापूर
- _औरंगाबाद
- _हिंगोली
- ♻ ताज्या बातम्या
- 🌍 देशविदेश
- _पर्यावरण
- 🎭 मनोरंजन
- _लाइफस्टाइल
- _योग
- _जोतिष
- __वास्तुसल्ला
- _अभंग
- _कविता
- __नारायणास्त्र
- __ग्रामीण कडे
- __" कर्तव्यदक्ष पोलीस"
- __आई म्हणजे
- __खरं प्रेम
- __भाकर
- __आंनदी जत्रा
- __कोरोना
- __आठवडा ..
- ⚕️ आरोग्य
- _केस गळती
- _रोगप्रतिकारक शक्ती
- 👨🌾कृषिवार्ता
- शैक्षणिक
- _भरती
- _पुरस्कार
- _📲 App

