shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

नागरिकांची प्रलंबित कामे वेळेत पूर्ण करा प्रहार जनशक्ती चे तहसीलदारांना निवेदन..!

शिर्डी प्रतिनिधी (संजय महाजन):- दि.30/09/2022 रोजी सन्माननीय माजी राज्यमंत्री बच्चू भाऊ कडू यांच्या आदेशाने प्रहारच्या वरिष्ठ पदाधिकारी कडून कोपरगाव तालुक्यातील प्रहार पदाधिकाऱ्यांकडून चर्चा करून विविध समस्या जाणून घेतल्या व त्या सोडवण्यासाठी शेवटपर्यंत प्रयत्न करणार असल्याचे ग्वाही दत्तू भाऊ बोडके यांनी दिली कोपरगांव तालुक्यातील प्रहार सेवक मोठ्या प्रमाणात प्रहार जनशक्ती पक्ष अहमदनगर जिल्हा संघटक श्री.अभिजीत कालेकर, जिल्हा कार्यध्यक्ष श्री .संजय शिंदे, तालुका शेतकरी अध्यक्ष श्री .किसनराव पवार, तालुका अध्यक्ष संदिप क्षिरसागर, विद्यार्थी तालुका अध्यक्ष अक्षय काळे,उपस्थित होते तालुक्यातील इतर भागातील जी काही शासकीय कामे नागरिकांची कामे रखडलेली होती ते कामे मार्गी लावण्यासाठी व इतर नागरीक जे काही प्रशासकिय कामे घेऊन येतील ते शासकिय नियमाने वेळेत पूर्ण करावेत.

या करिता प्रहार जनशक्ती पक्ष उत्तर महाराष्ट्र संपर्क प्रमुख श्री.दत्ताभाऊ बोडके,  यांनी कोपरगाव तालुक्यात मा.तहसीलदार विजय बोरूडे मा. गटविकास अधिकारी सचिन सुर्यवंशी मा.कृषी अधिकारी मनोज सोनवणे व इतर विभागातील अधिकारी वर्गाची भेट घेऊन अनेक प्रलंबित विषयवार चर्चा झाली तरी प्रशासकीय अधिकारी यांनी देखील मान्य केले कि प्रलंबित प्रकरणे लवकरात लवकर निकाली काढू असे आश्वासन दिले.

त्या वेळी प्रहार जनशक्ती पक्ष  नाशिक जिल्हा चिटणीस समाधान बागल, प्रहार विद्यार्थी जिल्हा अध्यक्ष दत्ता भाऊ आरोटे तालुका उपाध्यक्ष किसन सोनवणे प्रहार दिव्यांग क्रांती शहराध्यक्ष प्रवीण भुजडे तालुका संघटक दत्ताभाऊ भोसले, तालुका कार्य अध्यक्ष परजणे,राहता दिव्यांग अध्यक्ष श्री नितीन भन्साळी, श्री.सचिन  आरने ,सागर भाऊ आहेर,अक्षय  काळे,माहेगांव देशमुख प्रहार शाखा अध्यक्ष नवनाथ भाऊ वाघ, कैलास भाऊ पवार व  प्रशासकिय प्रलंबित कामापासून व्यथीत असणारे नागरिक व इतर सर्व प्रहार जनशक्ती पक्ष प्रहार सैनिक व महिला शेतकरी उपस्थित होते.
close