(वृक्षारोपण, स्वच्छता अभियान,विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप)
प्रकाश मुंडे | बीड जिल्हा प्रतिनिधि :-
केज नगरपंचायत चे माजी नगराध्यक्ष,भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे युवा नेते,माऊली विद्यापीठाचे सचिव आदित्य अशोकराव पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त माऊली विद्यापीठ अंतर्गत विविध शाळा महाविद्यालयात स्वच्छता अभियान, वृक्षारोपण, विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप, खाऊ वाटप अशा विविध सामाजिक उपक्रमांनी वाढदिवस साजरा करण्यात आला.
संस्थेचे प्रशासकीय अधिकारी प्रताप मोरे, प्रविणकुमार शेप,मनीष जाजू यांच्या हस्ते वृक्षारोपण, शालेय साहित्य वाटप करण्यात आले.
भाऊसाहेब पाटील अध्यापक विद्यालय, महाविद्यालय परिसरात स्वच्छता अभियान राबविण्यात आले.प्राथमिक माध्यमिक विद्यालय उमरी येथे विद्यार्थ्यांना खाऊचे वाटप करण्यात आले. रामराव पाटील उच्च माध्यमिक विद्यालयात मनीष जाजू यांच्यामार्फत विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वह्याचे मोफत वाटप करण्यात आले.सरस्वती कन्या प्रशाळेत रांगोळी स्पर्धा, व खाऊ वाटप कार्यक्रम घेण्यात आला.
सरस्वती महाविद्यालय परिसरात वृक्षारोपण
आदर्श प्राथमिक शाळेत शाळेत वही पेन,गरजू विद्यार्थ्यांना गणवेश वाटप, खाऊ वाटप,वृक्षारोपण करण्यात आले. अनावश्यक खर्च टाळून सामाजिक उपक्रमांनी वाढदिवस साजरा करण्यात आला.
मुख्याध्यापिका सविता घुले ,प्राचार्य डॉ जी बी पाटील,मुख्याध्यापक धनराज सोनवणे, प्राचार्य डॉ हनुमंत सौदागर, प्राचार्य विजय शिनगारे,मुख्याध्यापक राम कांबळे,सहशिक्षक विलास भिसे ,मुख्याध्यापक संदीप सत्वधर आदींच्या नियोजनातून उपक्रम घेण्यात आले. कार्यक्रमास शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी,विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.


