निरा नरसिंहपुर या ग्रामपंचायतीच्या उपसरपंच पदी सौ.रेणुका आनंद काकडे बिनविरोध निवड.
इंदापूर प्रतिनिधी: इंदापूर तालुक्यातील निरा नरसिंहपुर या ग्रामपंचायतीच्या उपसरपंच पदी सौ.रेणुका आनंद काकडे बिनविरोध निवड करण्यात आली. सरपंच आश्विनी सरवदे यांच्या अध्यक्षतेखाली ग्रामपंचायतीची विशेष सभा घेण्यात आली. या सभेत काकडे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. या निवडीमुळे त्यांचे सर्वत्र अभिनंदन केले जात आहे.
निरा नरसिंहपुर ही ग्रामपंचायत श्रीमंत म्हणून संपूर्ण तालुक्यात ओळखली जाते. या ग्रामपंचायतीची सदस्य संख्या नउ आहे. सदस्यांत ठरलेल्या समझोता प्रमाणे पहिले वर्षे तत्कालीन उपसरपंच विठ्ठल देशमुख तसेच सुनिल मोहिते यांचा एक वर्षाचा कालावधी संपुष्टात आल्याने त्यांनी राजीनामा दिला .त्यामुळे उपसरपंच पद रिक्त होते. या पदासाठी आज झालेल्या निवडणुकीत रेणुका काकडे यांचा एकमेव अर्ज प्राप्त झाल्याने त्यांची उपसरपंच पदी निवड झाल्याची घोषणा करण्यात आली.
ग्रामपंचायतीच्या अखत्यारित येणाऱी विकास कामे दलित व आदिवासी वस्तीतील प्रलंबित कामे, गावातील रस्ते, पाणी योजना, स्वच्छता ही कामे अग्रक्रमाने हाती घेऊन स्वच्छ व सुंदर नरसिंहपुर करण्याचा प्रयत्न करणार असल्याचा मानस काकडे यांनी बोलून दाखविला आहे. उपसरपंच निवडणूक वेळी सरपंच ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते. ग्रामसेवक व गावातील जेष्ठ उपस्थित होते सरपंच ग्रामपंचायत सदस्य ग्रामसेवक यांनी सौ काकडे यांचे अभिनंदन करून त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

