शिर्डी एक्स्प्रेस लाईव्ह वृत्तसेवा अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी- दिपक हरिश्चंद्रे.
मंगळवार दिनांक ११ ऑक्टोंबर २०२२
प्रहार च्या तक्रारीची दखल...कांदा खरेदीत शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्या व्यापाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करू -जिल्हा उपनिबंधक गणेश पुरी..!!
अहमदनगर : कांदा खरेदीत शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्या व्यापाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करू असे प्रतिपादन जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था अहमदनगर चे गणेश पुरी यांनी केले.
प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने अहमदनगर जिल्ह्यातील घोडेगाव बाजार समिती येथे चार पाच गोण्यांचे एकाच वक्कल कांद्याची अती जास्त दराने विक्री करून शेतकऱ्यांचा माल चाळीतून बाहेर काढण्यासाठी जिल्हयातील शेतकऱ्यांची दिशाभूल करून बाजार समितीच्या आवारात आलेल्या कांद्याला कमी दराने खरेदी करून फसवणूक होत असल्याबाबत प्रहार चे जिल्हाध्यक्ष अभिजीत दादा पोटे, श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघाचे अध्यक्ष आप्पासाहेब ढूस, कामगार संघटनेचे श्रीरामपूर विधानसभा क्षेत्र प्रमुख बाळासाहेब कराळे आदींनी अहमदनगर येथील जिल्हा उपनिबंधक कार्यालयात पूरी साहेब यांना दिलेल्या तक्रार निवेदन प्रसंगी पुरी बोलत होते.
(छाया - जिल्हा उपनिबंधक गणेश पुरी यांना निवेदन देतानाप्रहार चे जिल्हाध्यक्ष अभिजीत दादा पोटे, श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघाचे अध्यक्ष आप्पासाहेब ढूस, कामगार संघटनेचे श्रीरामपूर विधानसभा क्षेत्र प्रमुख बाळासाहेब कराळे)
प्रसंगी दिलेल्या निवेदनात म्हंटले आहे की, घोडेगाव येथिल बाजार समितीमध्ये नुकताच 33 रुपयांनी चार-पाच गोन्यांचे एका व्यापाऱ्याने खरेदी करून त्याची माध्यमांद्वारे प्रसिद्धी दिली आहे. जिल्ह्यातील बाकीच्या बाजार समितीमध्ये त्यापेक्षा कमी दराने कांदा खरेदी होत असल्याने घोडेगाव चे जास्त दराने कांदा खरेदी करणे षड्यंत्र असल्याचे जाणवते. जास्त दराने कांदा विकला जात असल्याचा माध्यमातून आभास निर्माण करून शेतकऱ्यांना चाळीबाहेर कांदा काढायला भाग पाडले जात आहे. व हा कांदा बाजारात आल्यानंतर कमी दराने त्याची खरेदी करून शेतकऱ्यांची फसवणूक केली जात आहे. या घटनेची तात्काळ चौकशी करून दोषींवर कारवाई करावी असे जिल्हाध्यक्ष अभिजीत दादा पोटे यांनी निवेदनाद्वारे म्हंटले आहे.
प्रसंगी या निवेदनाला स्वीकारताना जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था अहमदनगर पुरी साहेब यांनी चौकशीचे आदेश दिले असून चौकशी अंति दोशी आढळून येणाऱ्या व्यापाऱ्यांचे परवाने रद्द करण्यात येतील असे पुरी यांनी निवेदन स्वीकारताना सांगितले.
Shirdi Express Live🎥#करीता बातम्या📰🗞️ आणि जाहिराती 🖼️साठी संपर्क @दिपक हरिश्चंद्रे (अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी )📲7350591600

