😜 मिडी गेली, साडी गेली,
फ्रॉक तर दिसेनासाच झाला l
बघता बघता अवघ्या महाराष्ट्राचा
पंजाब होऊन गेला ll
😜 कुंकू गेलं, टिकली आली,
तीही न्हाणी घरात गेली आणि
अवघी न्हाणी सुवाशीण झाली ll
😜 बाबा कधीच गेला,
बिचाऱ्या आईनं अंथरूण धरलं l
काल जन्माला आलेल मुल
मम्मी- पप्पा म्हणू लागलं ll
😜 फेटा राहिला कार्यापुरता,
गांधी टोपीचे दिवस सरत आले l
पंचविशीच्या पोरांचे~
केस फारच पिकू लागले ll
😜 गावात रंगलेला गप्पांचा पार,
कधीचाच ओस पडला l
हिंडता फिरताना माणूस आतां...
'एकटाच ' बोलू लागला ll
😜 यंत्र आणि तंत्रामुळे
कष्ट फारच कमी झाले l
धकाधकीच्या जीवनात
मरण मात्र स्वस्त झाले ll
😜 कंप्युटर आणि इंटरनेटमुळे,
जग फारच जवळ आलं !!
माणसांच्या या अफाट गर्दीत
माणूसपण हरवून गेलं ll
😜 अहो, असा कसा हा,
फॅशनचा जमाना आला ॥
गृप मध्ये एवढी गर्दी असूनही...
माणूस एकटाच राहिला ll

