जि. प. प्राथमिक शाळा वडापुरी येथे महाभोंडला उत्साहात संपन्न.
इंदापूर प्रतिनिधी: जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वडापुरी येथे महाभोंडला कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.विविध उपक्रमातून शैक्षणिक नवनिर्मिती करणारी शाळा म्हणून वडापुरी शाळेचे नाव घेतले जाते. गजराजाचे पुजन करून सुरुवात केली.या महाभोंडल्यात विद्यार्थ्यांनी विविध पारंपरिक सांस्कृतीक वेशभूषा करून आले होते. विद्यार्थ्यांनी आणि शिक्षकांनी दांडीयानृत्ये करून गाण्यांचे सादरीकरण केले.
स्वच्छता अभियान, अंधश्रद्धा निर्मूलन , लेक वाचवा, झाडे लावा ,झाडे जगवा , जल,ध्वनी,आणि वायू प्रदुषण एक समस्या अशा अनेक बाबींवर प्रबोधनात्मक गीते आणि प्रबोधनपर पथनाट्ये सादरीकरण करण्यात आले. फनी गेम्स , संगीत खुर्ची ,चमचा लिंबू हे मनोरंजनात्मक खेळ घेण्यात आले.पालकांनी विद्यार्थ्यांना खाऊवाटप केले.शाळेच्या वतीने विद्यार्थ्यांना गोड जेवण दिले. यावेळी महिला पालक आणि गावातील ग्रामस्थ बहुसंख्येने उपस्थित होते.कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी मुख्याध्यापक रझिया शेख ,उपशिक्षिका मनिषा मोरे ,प्रतिभा गर्कळ आणि उपशिक्षक श्यामसुंदर माने ,अंगणवाडी सेविका माधुरी माने यांनी प्रयत्न केले.आदम पठाण, अमोल चंदनशिवे ,विठ्ठल कदम ,पोपट माने,संतोष पासगे, वर्षा चंदनशिवे, करिश्मा पठाण ,प्रिया पासगे,स्वाती चंदनशिवे इ.ग्रामस्थांचे सहकार्य लाभले.

