प्रतिनिधी : आसावरी वायकर
करमाळा : १ / करमाळा तालुक्याचे आराध्य दैवत श्री कमलाभवानी मंदिर, देवीचा माळ, करमाळा येथे रविवार दि. २ ऑक्टोंबर रोजी सकाळी ९ ते सायं .५ पर्यंत रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले आहे.
श्री जगदंबा कमलादेवी देवस्थान ट्रस्ट, श्री देवीचामाळ ग्रामपंचायत आणि बुधभूषण फाऊंडेशन, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने श्री कमलाभवानी मंदिर येथे हे शिबिर होणार आहे. सद्य परीस्थितीत रक्तपेढ्यांवर भासणा-या रक्त टंचाईच्या पार्श्वभूमीवर सामाजिक संघटनांनी हे शिबिर आयोजित केले आहे.
एका रक्तदात्याच्या रक्तघटकांचा किमान सहा रुग्णांना उपयोग होऊ शकतो. त्यामुळे 'रक्तदान जीवन दान' या भावनेतून जास्तीत जास्त रक्तदात्यांनी या शिबिरात सहभागी होण्याचे आवाहन श्री कमलादेवी देवस्थान ट्रस्ट, श्री देवीचामाळ ग्रामपंचायत आणि बुधभूषण फाऊंडेशन, पुणे यांच्यावतीने करण्यात आले आहे.
तरी परिसरातील सर्व नागरिकांनी उत्स्फूर्त पणे रक्तदान करून सत्कार्य करावे असे आयोजकांनी आवाहन केले आहे .

