।। ओम नमो भगवते वासुदेवाय ।।
एकादशीच्या व्रताला व्रतराज म्हटले जाते. कारण वर्षभरातील सर्व व्रतांमध्ये एकादशीचे व्रत सर्वोच्च, सर्वोत्तम, सर्वश्रेष्ठ मानले गेले आहे. पुराणांनुसार, पाशांकुशा एकादशीचे व्रत करणाऱ्यांना एका तपाचे पुण्य प्राप्त होते.
एकादशीला श्रीविष्णुंच्या पद्मनाथ स्वरुपाचे पूजन करण्याची परंपरा प्रचलित आहे. कुंडलीतील चंद्र कमकुवत असल्यास पाशांकुशा एकादशीचे व्रत आवर्जुन करावे, असे सांगितले जाते. महाभारत काळात श्रीकृष्णाने या एकादशीचे महत्त्व युधिष्ठिराला सांगितले होते. पाशांकुशा एकादशीमुळे सर्व पापांचा नाश होतो. पापातून मुक्तता मिळते.
या एकादशीला दानधर्म आणि पवित्र नद्यांमध्ये स्नान करण्याला विशेष महत्त्व असून, याच्या प्रभावामुळे सूर्य यज्ञाचे फलप्राप्त होते, असे सांगितले जाते.*
*आजचा राहुकाळ - दुपारी :- १.३० ते ३.०० वाजे पर्यंत.*
🌹🙏🏻🙏🏻🙏🏻🌹
*।। श्री स्वामी समर्थ ।। शुभ प्रभात ।।*
*हे ईश्वरा ! सर्व जीवसृष्टी सुखी राहो ! सर्वांचे जीवन रोगमुक्त राहो ! आम्हा सर्वांना कुशलता दे ! सर्व दु:खमुक्त राहोत !*
*हे ईश्वरा ! सर्वत्र शान्ति असु दे !*
माहिती संकलन:-
हभप बापुजी महाराज

