कोल्हापूर । प्रतिनिधी :
सहारा एजन्सी व एम एम शेख फाउंडेशन यांच्या वतीने श्री विद्यामंदिर, सोमवार पेठ, कोल्हापूर येथील गरीब विद्यार्थ्यांना स्कूल बॅग व शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले. आतापर्यंत सहारा एजन्सी व एम एम शेख फाउंडेशन कडून तीनशेहून अधिक विद्यार्थ्यांना स्कूल बॅग, शालेय गणवेश व शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले आहे. शाळेच्या स्टाफ च्या वतीने एम एम शेख फाउंडेशनचे अध्यक्ष श्री . एम एम शेख व सहारा एजन्सी चे आभार मानण्यात आले.
कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्थाविक मुख्याध्यापक श्री ए .एस.वागरे यांनी केले. तर सूत्रसंचालन अक्षय गुरव यांनी केले. कार्यक्रमास यावेळी शाळेतील विद्यार्थी, शिक्षक स्टाफ व सहारा एजन्सी चे प्रतिनिधी प्रमोद जगताप व शरद दंडगुळे उपस्थित होते.

