shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

राज्यस्तरीय बेंच प्रेस स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ माजी राज्यमंत्री तथा आमदार दत्तात्रय भरणे यांच्या हस्ते संपन्न.

राज्यस्तरीय बेंच प्रेस स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ  माजी राज्यमंत्री तथा आमदार दत्तात्रय भरणे यांच्या हस्ते संपन्न.
  इंदापूर प्रतिनिधी: इंदापूर प्रतिनिधी:  इंदापूर तालुक्यामध्ये प्रथमच झालेल्या राज्यस्तरीय बेंच प्रेस चॅम्पियनशिप स्पर्धा शिवशुंभू पॅलेस येथे आयोजित करण्यात आल्या होत्या, या बक्षीस वितरण समारंभ  महाराष्ट्र राज्याचे माजी राज्यमंत्री तथा इंदापूर तालुक्याचे आमदार दत्तात्रय भरणे  यांच्या हस्ते आज शिवशंभू पॅलेस वरकुटे पाटी येथे संपन्न झाला. 
या स्पर्धेमध्ये २२जिल्हातुन ४०५ पुरुष व १७५ महिला खेळाडूंनी सहभाग घेतला होता,याचे नियोजन इंदापूर  शिवसेना तालुकाप्रमुख नितीन शिंदे, कर्मयोगी सहकारी साखर कारखान्याचे माजी संचालक देविदास पाटील ,शिव शंभो व देवपूजा पतसंस्थेचे संस्थापक श्री सुधीर पाटील, व न्यूट्रिरीच सप्लीमेंट,फिटनेस फोर्ट चे संस्थापक मयूर शिंदे यांनी केले.
       यावेळी प्रमुख उपस्थिती विशाल बोंद्रे जिल्हा समन्वयक, भिमराव भोसले जिल्हा समन्वयक , सचिन सपकळ माजी जिल्हा नियोजन समिती,आरूण पवार तालुका समन्वयक, सुदर्शन रणवरे तालुका संघटक, महादेव सोमवंशी शहर प्रमुख, प्रशांत गलांडे भाजप युवा मोर्चा, आप्पा डोंगरे उपतालुकाप्रमुख,  युवक तालुकाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस ॲड,शुभम निंबाळकर, अंकुश गलांडे विभाग प्रमुख, हेमंत भोसले उपविभाग प्रमुख,सुरेश बापू शिंदे , सोमनाथ पाटील देवपूजा पतसंस्थेचे चेअरमन, सचिन पाटील, शंभु पाटील,सागर पाटील, सुनील लवटे गणेश नागरीसंचालक, अतुल वाघमोडे काटी ग्रामपंचायत सदस्य, संजय सरदेसाई सरचिटणीस महाराष्ट्र राज्य पावर लिफ्टिंग असोसिएशन , ॲड. रवींद्र यादव, सचिव महाराष्ट्र राज्य पावर लिफ्टिंग असोसिएशन अनंत चाळके ,पंच सूर्यकांत गर्दे आदी क्रिडा शौकीन मोठ्या संख्येने उपस्थित होते .
close