shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

केज रोटरी डान्स स्पर्धेत आरोही काकडे, विदीशा गायकवाड प्रथम तर चेतना काळे द्वितीय स्थानी!!

प्रकाश मुंडे | बीड जिल्हा प्रतिनिधि  :-

 नवरात्र महोत्सवानिमित्त केज शहरातील नवसाला पावणारी आई भवानी मंदिर परिसरात केज रोटरीने आयोजित केलेल्या डान्स स्पर्धेत कु. आरोही काकडे व विदिशा गायकवाड या दोघींनी प्रथम स्थान पटकावले. तर कु चेतना काळे हिने द्वितीय स्थान मिळवले. या स्पर्धेत तिसरा क्रमांक कु. ज्योती नेहरकर व गार्गी गवळी यांना मिळाला. विशेष प्रोत्साहन बक्षिसे कु. गार्गी भोयटे व मोरे यांनी पटकावली.




केज रोटरीने आयोजित केलेल्या या स्पर्धेत एकूण 48 स्पर्धकांनी सहभाग नोंदवला. स्पर्धकांनी अतिशय सुंदर नृत्ये सादर केली.

या स्पर्धेचे परीक्षण रो .डी .एस साखरे व  रो. विकास मिरगणे यांनी केले. सूत्रसंचालन रो. हनुमंत भोसले व दादा जमाले पाटील यांनी केले. कार्यक्रमासाठी केज शहरातील कलाप्रेमी  युवक-युवती व नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. स्पर्धेचे बक्षीस वितरण 12 ऑक्टोबर रोजी करण्यात येणार असल्याची माहिती केज रोटरीचे अध्यक्ष पशुपतीनाथ दांगट, सचिव सूर्यकांत चवरे व प्रोजेक्ट चेअरमन हनुमंत भोसले यांनी दिली आहे. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रवीण देशपांडे,  धनराज पुरी यांच्यासह इतर सदस्यांनी  विशेष परिश्रम घेतले.

close