shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

तांडव प्रतिष्ठान केज आयोजित भव्य रक्तदान शिबीर संपन्न!!

प्रकाश मुंडे | बीड जिल्हा प्रतिनिधि  :-                                  

तांडव प्रतिष्ठान आयोजित भव्य रक्तदान शिबीर केज शहरातील वकिलवाडी येथील हनुमान मंदिरात संपन्न झाले. तांडव प्रतिष्ठान केज ने सलग तिसऱ्या वर्षी या भव्य रक्तदान शिबीराचे आयोजन केले होते. त्यांच्या या कार्याचे सर्व स्तरातुन कौतुक केले जात आहे. 






या वेळी नगराध्यक्षा सौ. शितलताई बनसोड, गट नेते हारूनभाई इनामदार, डॉ. संभाजी वायबसे, लक्ष्मण भाऊ जाधव, बाळासाहेब ठोंबरे, गवळी सर, डॉ. विवेकानंद डोईफोडे हे मान्यवर उपस्थित होते. त्यांनी तांडव प्रतिष्ठान केज च्या सर्व सदस्यांचे अभिनंदन केले . यावेळी कार्यक्रमास तांडव प्रतिष्ठान चे कार्यकर्ते व मित्रपरिवार मोठ्या प्रमाणात उपस्थित होता. यामध्ये अज्जु भाऊ तांदळे, संतोष चौरे, विशाल मुंडे, अमर धपाटे,प्रकाश बिक्कड, अमित कुलकर्णी, रोहित शर्मा,रूषिकेश कदम, संजय लोंढे,स्वामी बांगर, लखन कदम, रंगनाथ रोडे, अभि कोहाळे,सागर काळे, जयश पैठणकर,शुभम जाधव, राजेभाऊ घुले उपस्थित होते. या सर्वांनी रक्तदान शिबीर यशस्वी करण्यासाठी प्रयत्न केले.

close