समाजसेवक पद्मश्री आण्णा हजारे यांनी लोकपाल विधेयक यावे यासाठी बारा दिवस दिल्ली मध्ये उपोषण केले.. संपूर्ण देश भ्रष्टाचारानचे विरुद्ध एकवटला.. गावा गावात मोर्चे निघू लागले..
एक हास्यास्पद गोष्ट त्यावेळेस बघायला मिळाली.. आण्णांचे आंदोलन चिरडण्यासाठी भ्रष्टाचारी एकवटले.... मोर्चांचे नेतृत्व भ्रष्टाचारी च करू लागले.. अंतिमतः सत्याग्रह चे तीनतेरा वाजवण्यात ते भ्रष्टाचारी यशस्वी ठरले..
आता गावा गावात नवरात्री उत्सव साजरा होतो.. प्रत्येक गावात उत्सव भ्रष्टाचारी लोकांचे पैशाने साजरा होतो.. आणि दसऱ्याचे दिवशी रावणाचे दहन होते.. रावणाचे दहन त्या त्या गावातील भ्रष्टाचारी नेता स्वयं दहन करतो व त्या रावण दहनाला त्याला भ्रष्टाचाराला सहकार्य करणारे सवंगडी हजर असतात..
हिन्दू धर्माचा व त्यामध्ये असलेल्या चांगल्या परंपरा उध्वसत करण्याचा, त्यांची चेष्टा करण्याचा जणू भ्रष्ट नेत्यांनी ठेकाच घेतलेला आहे...
पुरातन काळात रावण हि अपप्रवृत्ती होती.. प्रभू श्रीरामचंद्र यांनी ह्या अपप्रवृत्ती चा सर्वनाष केला.. त्यांना हे पवित्र काम करण्यासाठी वानरसेनेनी मदत केली...
पण आज हिन्दू परंपरा उध्वस्त करण्याचा ठेकाच ह्या भ्रष्टाचारी लोकांनी घेतला आहे..हिन्दू सणांचा, उत्सवांचा यांनी स्वत:च्या प्रचार व प्रसाराचे माध्यम बनवले... उत्सवांना भ्रष्टाचाराने कमवलेली माया देऊन समाजात व तरुणां मध्ये अनिष्ट प्रवृत्तीचे प्रदर्शन वाढवले.. यांचे भालदार चोपदार पाहून अनेक कर्मठ हिन्दू ह्या उत्सव सणां पासून लांब चाललेत.
भ्रष्टाचार , गुंडगिरी, दलाली, कमिशनची चटक, व्याभिचार, लोचटपणा हि नवीन नितिमुल्य जपणारे नेत्यांचे पाईक झाले.. गल्ली ते दिल्ली पर्यंत हिन्दू संस्कृती व संस्कार मोडकळीस आणण्याची सुपारी च यांनी घेतली आहे..
*काल दसऱ्याला भ्रष्टाचारी नेते अनेक ठिकाणी रावण दहन करुन समाजाची व हिन्दू धर्माची चेष्टा करत होते... गावातील रस्ते, प्रदुषण, खड्डे, दुषित पाणी, बोकाळलेली गुंडगिरी भ्रष्टाचार, शिक्षणासाठी डोनेशन, अशा प्रवृत्ती स्वत:च जोपासून त्याला वर्षानुवर्षे बळकटी दिली.. आणि आज भ्रष्टाचारी सवंगड्यांसह नकली रावण जाळण्याची क्रूर चेष्टा हिन्दू समाजाची ह्या समाजकंटक यांनी चालवली आहे..*
धर्म कुठलाही असो हिन्दू, मुस्लिम, सिख, ईसाई, बौध्द... कुठलाही धर्म भ्रष्टाचार, गुंडगिरी, कमिशन खोरी करुन निसर्गाचा ऱ्हास करण्याची, सामान्य जनतेला त्रास होईल असे वर्तणूक करण्याची परवानगी देत नाही..
*त्यातच हिन्दू धर्माच्या प्रत्येक उत्सवात समाज प्रबोधन करण्याचा गाभा आहे.. पण सामान्य माणूस.. चांगल्या प्रवृत्तीचा माणूस ह्या हिन्दू संस्कृती वर भ्रष्टाचारी व अपप्रवृत्ती ने प्रहार होत असताना शांत बसलेला आहे.. याला वेळीच विरोध केला नाही.. तर ह्या हिन्दू सणां मध्ये उत्सवात भ्रष्टाचारी परंपरा बळावतील व समाज व्यवस्थेवर भ्रष्टाचारी व गुंडगिरी चे खोलवर दूरगामी परिणाम येणाऱ्या पिढ्यांना भोगावे लागतील*
जे भ्रष्टाचार करणारे नेते कुठल्याही जातीच्या, धर्माच्या सणांचा ,उत्सवांचा वापर त्यांच्या प्रचार व प्रसारक साठी करीत असतील त्यांना त्या त्या समाजातील सुज्ञ लोकांनी विरोध करायला शिका.. तुमच्या जातीचा, धर्माचा, परंपरेचा ,भक्तीचा कुणीही बाजार मांडता कामा नये..
सावधान!
जागे व्हा
जयहिंद!
संजय भास्करराव काळे

