shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

प्रहारच्या वतीने देवळाली प्रवरा मध्ये कामगारांचे मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन.

देवळाली प्रवरा - 5 ऑक्टोबर
      दसऱ्याच्या शुभमुहूर्तावर प्रहार जनशक्ती पक्षाचे संस्थापक अध्यक्ष बच्चुभाऊ कडू व प्रहार चे अहमदनगर जिल्हा अध्यक्ष अभिजीत दादा पोटे यांचे मार्गदर्शनाखाली देवळाली प्रवरा येथे प्रहार कामगार संघटनेच्या वतीने संघटनेचे बाळासाहेब कराळे यांचे प्रयत्नातून व प्रहार जनशक्ती पक्षाचे श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघ क्षेत्राचे अध्यक्ष अप्पासाहेब ढूस यांचे प्रमुख उपस्थितीत देवळाली प्रवरा येथील असंघटित बांधकाम कामगार आणि त्यांचे कुटुंबासाठी मोफत आरोग्य तपासणी शिबिर संपन्न झाले. 


      प्रसंगी प्रहार श्रीरामपूर विधानसभा मतदार संघाचे अध्यक्ष आप्पासाहेब ढूस, प्रहार श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघ कामगार सेलचे प्रमुख बाळासाहेब कराळे, शेतकरी संघटनेचे प्रशांत कराळे,  आदिसह देवळाली प्रवरा हद्दीतील असंख्य नोंदणीकृत असंघटित बांधकाम कामगार सहकुटुंब या आरोग्य तपासणी शिबिरात उपस्थित होते. 
     प्रसंगी बोलताना आप्पासाहेब ढूस यांनी सांगितले की श्रीरामपूर विधानसभा मतदार संघातील जास्तीत जास्त असंघटित कामगारांनी कामगार मंडळाकडे त्यांची नोंदणी करून प्रहार कामगार संघटनेमध्ये सामील व्हावे व या संघटनेच्या वतीने देण्यात येणाऱ्या जास्तीत जास्त योजनांचा लाभ घ्यावा.
     प्रसंगी प्रहार कामगार संघटनेचे बाळासाहेब कराळे यांनी सांगितले की, कामगार मंडळाच्या वतीने देण्यात येणाऱ्या सर्व सुविधा कामगारांना आम्ही पुरवणार असून आज या ठिकाणी आयोजित मोफत आरोग्य तपासणी शिबिरास जास्तीत जास्त कामगारांनी आणि त्यांच्या कुटुंबियांनी उपस्थित राहून लाभ घ्यावा ही विनंती.
close