shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

दसरा मेळावा आढावा बैठक संपन्न...!

जगदीश का. काशिकर,
 कायदा (लॉ) / सुरक्षा / गुंतवणुक सल्लागार (कन्सलन्टंट) व मुक्त पत्रकार, महाराष्ट्र. व्हाटसअप – ९७६८४२५७५७

विरार: निष्ठावंत शिवसैनिकांची शिवसेना हीच शिवसेनेची खरी ओळख परंतु त्याही पेक्षा शिवसैनिकांची मोठी ओळख म्हणजे दसरा मेळावा. दरवर्षी येणाऱ्या दसरा मेळावा साठी प्रत्येक शिवसैनिक डोळ्यात तेल घालून उत्सुकतेने नवरात्री उत्सवाची वाट पाहत असतो.
       

हिंदुह्रदय सम्राट, शिवसेनाप्रमुख श्रीमान.बाळासाहेब ठाकरे यांनी घडविलेल्या कट्टर, निष्ठावंत शिवसैनिक दर वर्षी दसरा मेळाव्यात विचारांचे सोनं लुटायसाठी लाखोंच्या संख्येने शिवतिर्थावर उपस्थित असतो.
       

कोविड मुळे गेल्या दोन वर्षात दसरा मेळावा न झाल्यामुळे आतुन नाराज झालेला पण गद्दारांनी दिलेल्या आव्हानाने पेटुन उठलेला निष्ठावंत शिवसैनिक आता २०२२ ला होणार्या दसरा मेळाव्यात जल्लोष साजरा करण्यासाठी तसेच विचारांचे सोनं लुटताना शिवतिर्थावर दिसणार आहे.
        
त्या पाश्वभूमीवर पालघर जिल्हाप्रमुख श्री.पंकज देशमुख यांच्या आदेशाने विरार शहर प्रमुख श्री.उदय जाधव यांनी रविवार दि.०२ ऑक्टो २०२२ रोजी विरार शहरातील शिवसैनिकांचा उत्साह वाढविण्यासाठी दसरा मेळावा संदर्भात आढावा बैठक आयोजित करण्यात आली. या बैठकीत विरार शहरातील कट्टर, निष्ठावंत शिवसेना पदाधिकारी, युवासेना, महिला आघाडी यांनी आपली उपस्थिती मोठ्या संख्येने दर्शवली.
       
यावेळी भाजपा अल्पसंख्याक सेलचे पालघर जिल्हा  श्री.साबीर शेख यांनी भगवा हाती घेऊन शिवसेनेत प्रवेश केला तसेच चंदनसार विभागप्रमुख श्री.महेंद्र सकपाळ यांनी दसरा मेळाव्यासाठी बनविलेल्या टि-शर्ट चे प्रकाशन प्रमुख मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
       
या सभेला उपजिल्हाप्रमुख श्री.दिलीप पिंपळे, तालुकाप्रमुख श्री.स्वप्नील बांदेकर, उपतालुकाप्रमुख श्री.मनिष वैद्य, उपतालुका समन्वयक श्री.नरेश वैद्य, अवजड वाहतुक सेना जिल्हाप्रमुख श्री.आनंद चोरघे, शहरप्रमुख श्री.उदय जाधव यांनी उपस्थित राहून निष्ठावंत शिवसैनिकांना दसरा मेळाव्याच्या विरार शहरातील तयारी बाबत चर्चा करून प्रमुख मार्गदर्शन केेले.
close