प्रतिनिधी: सुर्यकांत होनप 

करमाळा: दि. ५ / करमाळा शहरात नवरात्र उत्सवाच्या पावनप्रसंगी श्री क्षेत्र श्री कमला भवानी मंदिरामध्ये भव्य आणि स्मरणीय रक्तदान शिबिर पार पडले.

करमाळा शहरामध्ये नव्यानेच चालू करण्यात आलेल्या श्री कमला भवानी ब्लड सेंटर साठी श्री जगदंबा कमलादेवी देवस्थान ट्रस्ट, श्री देवीचा माळ ग्रामपंचायत व बुधभूषण फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. श्री कमला भवानी ब्लड सेंटरचे जनसंपर्क अधिकारी श्री मंगेश सुरवसे यांनी दिलेल्या माहितीनुसार या रक्तदान शिबिरास प्रशासनाकडून फक्त एक दिवसाची परवानगी मिळाली होती. परंतु रक्तदात्यांचा वाढता प्रतिसाद पाहून आणखीन दोन दिवस रक्तदान शिबिरास परवानगी वाढवून देण्यात आली. आणि पुढील वर्षी आपण पूर्ण नवरात्राचे नऊ दिवस शिबिर घेऊ शकता असे आश्वासनही दिले. जिथे एक दिवसाचे शिबिर होणार होते तिथे तीन दिवस शिबिर अतिशय यशस्वीरित्या व उस्फूर्त प्रतिसादाने पार पडले.

हे रक्तदान शिबिर यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी देवस्थान ट्रस्टचे प्रशासकीय अधिकारी महादेवराव भोसले, व्यवस्थापक अशोकराव घाटे, अध्यक्ष सोमनाथ चिवटे, अनिल पाटील, सुशील राठोड, श्री देवीचा माळ ग्रामपंचायतीच्या वतीने सरपंच महेश सोरटे, तंटामुक्ती अध्यक्ष सचिन चोरमले, तसेच बुधभूषण फाउंडेशन चे व्हा. चेअरमन दुर्गेश राठोड यांचे विशेष सहकार्य लाभले.

पौराणिक श्री कमला भवानी देवीच्या दरबारा मधील पहिलेच रक्तदान शिबिर घेण्यात आले .
 श्री कमला भवानी ब्लड सेंटर साठी करमाळा तालुक्यामधील पहिलेच "श्री गणेशा..!" या रक्तदान शिबिराच्या माध्यमातून झाला.
 एकूण 85 रक्तदात्यांनी या शिबिरामध्ये "स्वेच्छा" रक्तदान केले.

आयोजकांच्या वतीने रक्तपेढीच्या सर्व टीमचे आभार मानण्यात आले तसेच त्यांच्या मेहनतीचे कौतुकही केले. व या रक्तपेढीच्या माध्यमातून गोरगरीब व गरजू रुग्णांसाठी  कधीही रक्ताची कमतरता भासू नये यासाठी भरभरून शुभेच्छा दिल्या.