shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

नवरात्र उत्सवात नारीशक्तिला भेटण्याचा योग लाभला...!

     १३ फेब्रुवारी २०१० साली सायंकाळी ०६:५८ मी. पुण्यात घडलेल्या *जर्मन बेकरी* बॉम्ब स्फोट मध्ये अनेकांना आपला जीव गमवावा लागला, आणि काही बचावले त्यात एक ह्या *आम्रपाली चव्हाण* मॅडम होत्या, दुर्घटना घडली त्या प्रत्येक क्षणाचे आज त्यांनी वर्णन केले, त्यांच्या शारीरिक अवयवांवर परिणाम तर झालेलाच, या व्यतिरिक्त त्यांच्या पायाला खूप दुखापत झाल्याने दिव्यांगत्वासोबत आजही त्यांचा लढा सुरूच आहे.
         पण, त्यांनी जिद्द सोडलेली नाही व नैराश्यतेवर मात करून, कठीण प्रसंगातून सावरून, सुखरूप बाहेर पडून आपली गिर्यारोहणाची आवड जोपासत, चित्तथरारक खेळात सहभागी होऊन सर्वांसमोर आदर्श निर्माण केला..आजही त्यांची ऊर्जा आणि इच्छाशक्ती थक्क करून सोडते...
    मुकेश प्रतिष्ठानचे सर्व सहकारी मंडळींनी त्यांची भेट घेतली व त्यांच्या कडून खूप काही शिकायला मिळाले..
  रुपाली पाठक मॅडम, राहुल दादा, स्मिता पवार, सौरभ देशपांडे सर, सर्वांचे आभार..

                 आपला,
     महेंद्र सुमन रामदास पवार
                 अध्यक्ष
           मुकेश प्रतिष्ठान
close