पुणतांबा (वार्ताहर):- आजच्या जागतिकीकरणात वाचन संस्कृती आणि समाजप्रबोधन मागे पडत आहे, अशा स्थितीत पुणतांबा येथील जैन समाजाचे जेष्ठ मार्गदर्शक संतोष चोरडिया यांनी आपल्या सहकारी मित्रांच्या मदतीने सुरु केलेली 'आनंद व्याख्यानमाला'ही गावाच्या आणि परिसरातील लोकांसाठी प्रबोधनाचा ज्ञानदीप ठरेल, असे मत श्रीरामपूर येथील वाचन संस्कृती प्रतिष्ठानचे संस्थापक, अध्यक्ष डॉ.बाबुराव उपाध्ये यांनी व्यक्त केले.
पुणतांबा येथील जैन स्थानकामध्ये म.गांधी व लालबहादूर शास्त्री जयंतीचे औचित्य साधून ' आनंद व्याख्यानमाले'चे उद्घाटन करण्यात आले. सामाजिक कार्यकर्ते संयोजक संतोष चोरडिया यांनी स्वागत, प्रास्ताविक केले.संतोष चोरडिया आणि कविवर्य चं.भा. रोकडे यांच्या संकल्पनेतून 'आनंद व्याख्यानमाला' या उपक्रमाची सुरुवात करण्यात आली. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे जेष्ठ साहित्यिक डॉ.बाबुराव उपाध्ये, महाराष्ट्र संपादक परिषदेचे कार्याध्यक्ष व स्नेहप्रकाश प्रकाशनचे व
पत्रकार प्रकाश कुलथे, स्वामी सहजानंद भारती शिक्षणशास्त्र महाविद्यालयाचे माजी प्राचार्य शन्करराव अनारसे, पुणतांब्याचे लोकनियुक्त सरपंच श्री धनंजय धनवटे, श्री मुरलीधर थोरात, श्री विजयराव धनवटे, अड, प्रशांत धोर्डे आदी मान्यवरांच्या शुभहस्ते दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात झाली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी प्राचार्य शन्करराव अनारसे होते. डॉ. बाबुराव उपाध्ये, पत्रकार प्रकाश कुलथे हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
संतोष चोरडिया यांनी आनंद व्याख्यानमालेचा मूळ उद्देश सांगितला, ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना वाचनाची तसेच व्याख्यान श्रवणाची गोडी लागावी व त्यातून एक सुसंस्कृत पिढी निर्माण व्हावी,वाचन संस्कृती वाढावी असे स्पष्ट केले.पत्रकार प्रकाश कुलथे यांनी
ग्रामीण भागामध्ये अशा प्रकारचा विचार समोर येऊन एक प्रेरणादायी काम हाती घेतल्याबद्दल 'आनंद व्याख्यानमाला' ग्रुपच्या सदस्यांचे कौतुक केले तर डॉ. उपाध्ये यांनी व्याख्याना बरोबरच लिखित साहित्य वाचण्याची देखील युवकांना गोडी लागावी यासाठी स्वतःकडील काही पुस्तके मंडळाला भेट देऊन ग्रंथालय चालू करण्याविषयी मार्गदर्शन केले. अध्यक्षीय भाषणामध्ये प्राचार्य शन्करराव अनारसे यांनी सांगितले की, वयाची कोणतीही मर्यादा न ठेवता प्रत्येकाने व्याख्यानाच्या माध्यमातून आपले जीवन आनंदमय केले पाहिजे तेव्हा आनंद व्याख्यानमालेचा उद्देश सफल होईल. याप्रसंगी वरील मान्यवरांबरोबरच दिनकरराव भोरकडे,, निवृत्ती पा. चव्हाण, पत्रकार श्री संजय जोगदंड, माधव ओझा, उमेश रोकडे, सुधीर देव, बाळासाहेब भोरकडे, दत्तात्रय धनवटे, राहुल धनवटे, चंद्रकांत धर्माधिकारी, राजकुमार लोढा, रामभाऊ जाधव, राजेंद्र पगारे, प्रणील शिंदेसर व ग्रामस्थ उपस्थित होते.
यावेळी चं.भा.रोकडे यांनी कवितावाचन केले सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन अड, प्रशांत धोर्डे यांनी केले.

