भारत नेपाळ शिक्षक एवं साहित्यकार संमेलनासाठी निमसाखर चे सुपुत्र राजेंद्र रणमोडे यांची निवड.
शहाजीराव पाटील माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय बोराटवाडी चे हिंदी विषयाचे शिक्षक राजेंद्र सर्जेराव रणमोडे यांची निवड.
इंदापूर प्रतिनिधी:१ नोव्हेबर २०२२ रोजी काठमांडू नेपाळ येथे भारत नेपाळ हिंदी शिक्षक तथा साहित्यिक संमेलन होत आहे दोन्ही देशाचे सुमारे शंभर हिंदी शिक्षक तथा साहित्यिक या संमेलनात सहभागी होणार आहेत या संमेलनासाठी लोकनेते शहाजीराव पाटील माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय बोराटवाडी चे हिंदी विषयाचे शिक्षक राजेंद्र सर्जेराव रणमोडे यांची निवड झाली आहे.
सदर निवड मुख्य संयोजक डॉ कैलास जाधव भारत सरकार व स्वागताध्यक्ष डॉ संगीता ठाकुर काठमांडो नेपाळ तसेच केंद्रीय समन्वयक उस्मान मुलाणी सर यांनी केली. या कार्यक्रमास प्रमुख बाबूराम भटटरायजी पूर्व प्रधानमंत्री नेपाळ सरकार हे उपस्थित राहणार आहेत या बद्दल श्री शिवाजी एज्युकेशन सोसायटी बावडाचे जेष्ठ संचालक उदयसिंह पाटील यांनी राजेंद्र रणमोडे सर यांचे अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या.यावेळी श्री शिवाजी एज्युकेशन सोसायटी बावडाचे संचालक स्वप्निल घोगरे, शिवाजी विद्यालयाचे प्राचार्य दशरथ घोगरे सर लोकनेते शहाजीराव पाटील माध्यमिक विद्यालयाचे प्राचार्य श्री भीमरावजी आवारे सर कर्मयोगी शंकरराव पाटील माध्यमिक विद्यालयाचे प्राचार्य गणेश घोरपडे सर श्री हनुमान विद्यालय सुरवडचे प्राचार्य चंद्रकांत कोकाटे सर, दिनेश पाटील सर व शिक्षक आघाडीचे अध्यक्ष संतोष कदम सर उपस्थित होते.

