शिर्डी एक्सप्रेस लाईव्ह नेटवर्क
बीड :-
बीड जिल्ह्यामधून एक धक्कादायक घटना घडल्याचे समोर येत असून या घटनेमुळे बीड शहरांमध्ये एकच खळबळ उडाली आहे.
भाजपचे कट्टर कार्यकर्ते व बीड शहर अध्यक्ष भगीरथ बियाणी यांनी आपल्या राहत्या घरी स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केली आहे. दुपारच्या वेळी बंदुकीतून सुटलेल्या गोळीबाराचा मोठ्याने आवाज आल्याने परिसरातील नागरिक, बिहाणीचे समर्थक आणि भाजपच्या कार्यकर्त्यांनी तातडीने त्यांच्या घराकडे धाव घेतांना दिसले. सदर घटनेची माहिती पोलिसांना मिळतात घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस देखील तात्काळ घटनास्थळी पोहोचल्यानंतर बियाणी यांच्या घराची पाहणी केली.तेव्हा बियाणी यांचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या स्थितीत आढळून आले.
घटनास्थळाचा पंचनामा केल्यानंतर बियाणी यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. मात्र, बियाणी यांनी इतक्या टोकाचे पाऊल का उचलले, स्वत: वर गोळी झाडून बियाणी यांनी आत्महत्या का केली, याबद्दल अद्याप कोणतीही माहिती समोर येऊ शकली नाही. घटनेची माहिती मिळताच खासदार प्रीतम मुंडे यांनी रुग्णालयात धाव घेतली. कार्यकर्ते आणि पोलिसांशी संवाद साधून घटनेची माहिती जाणून घेतली. बियाणी यांच्या आत्महत्येमुळे शहरात खळबळ उडाली आहे. या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस करत आहे.

