shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

जैन गुरुकुल येथे स्व. सोनटक्के गुरुजींना अभिवादन


 गुरुजींचे कार्य पुढे घेऊन जाणे हेच त्यांना खऱ्या अर्थाने अभिवादन - अरुण धुमाळ

प्रतिनिधी : संजय वायकर

सोलापूर : १२ /   श्री दिगंबर जैन गुरुकुल प्रशालेचे माजी मुख्याध्यापक स्व. आदिनाथ भाऊराव सोनटक्के गुरुजी यांचे ३७ वे पुण्यस्मरण मुख्याध्यापक आशितोष शहा यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाले. 

यावेळी कोल्हापूर जिल्हयातील बाहुबली विद्यापीठ, बाहुबलीचे माजी विद्यार्थी विजयकुमार शहा यांच्या हस्ते प्रतिमापूजन संपन्न झाले.

 याप्रसंगी स्व. सोनटक्के गुरुजी स्मारक निधी ट्रस्टचे कोषाध्यक्ष अरुणकुमार धुमाळ यांनी सोनटक्के गुरुजींचे कार्य पुढे घेऊन जाणे हेच त्यांना खऱ्या अर्थाने अभिवादन असेल तसेच संस्थेच्या व विद्यार्थ्यांच्या सेवेसाठी निस्वार्थपणे कार्य करणा-या गुरुजींचे अनुकरण आजच्या शिक्षकांनी करावे असे भावनिक आवाहन केले. यावेळी सर्व वातावरण भावुक झाले होते .

या प्रसंगी ट्रस्टचे सर्व विश्वस्त, प्रशालेतील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.
close