तब्बल ४७ वर्षानंतर निमगाव केतकी येथील श्री केतकेश्वर विद्यालयात रविवारी भरला माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळा.
स्नेहमेळाव्यात माजी विद्यार्थ्यांनी अनेक जुन्या आठवणींना दिला उजाळा .
इंदापूर प्रतिनिधी: निमगाव केतकी येथील श्री केतकेश्वर विद्यालयात रविवारी विद्यालयातील सन १९७४_७५ साली शिकत असलेले माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळा संपन्न झाला . तब्बल ४७ वर्षानंतर भरलेल्या वर्गात माजी विद्यार्थ्यांनी अनेक जुन्या आठवणींना उजाळा दिला.
विद्यालयाच्या प्रांगणात माजी विद्यार्थ्यांनी कार्यक्रमाचे उत्कृष्ट नियोजन केले होते.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी निवृत्त शिक्षक एस.बी.शिंदे हे होते. कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलन करून करण्यात आली.
यावेळी शोभा शहा, शकुंतला भोंग, हेमलता बडवे, मीना डोईफोडे, शिवाजी यादव, मोहन पाटील, दिलीप मिसाळ, निजाम मुलानी, मच्छिंद्र चांदणे यांनी मनोगतात अनेक जुन्या आठवणींना उजाळा दिला.
या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित राहिलेले निवृत्त शिक्षक एस.बी. शिंदे, के.बी. अवसरे, के.एस. शिंदे, के.एल. वटे, आर.एस. गायकवाड, ऐ.ऐ. देसाई यांचा शाल श्रीफळ व फेटा बांधून सन्मान करण्यात आला. या सर्व निवृत्त शिक्षकांनीही आपल्या भावना व्यक्त केल्या.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मच्छिंद्र चांदणे, भानुदास राऊत, दादाराव आदलिंग, दिनकर बनकर व प्रभाकर शेंडे यांनी परिश्रम घेतले.
कार्यक्रमास विद्यालयाचे प्राचार्य आर.डी. चव्हाण, डॉक्टर होरा, तंटामुक्तीची माजी अध्यक्ष दत्तात्रय चांदणे, बोराटे साहेब हेही उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक औदुंबर शिंदे यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन धन्यकुमार उपाध्ये व संजय कुलकर्णी यांनी केले व आभार छगन भोंगळे यांनी मानले.
.

