यावेळी व्यापारी संघटनेचे मिरगणे अप्पा, वकील संघटनेचे अँड.लाड व डॉ. यांनी आपापल्या समस्या मांडल्या.यावर उत्तर देताना डॉ. प्रितम ताई मुंडे म्हणाल्या की संबंधित विभागाला पंधरा दिवस ते महिणा भरात बैठक घेऊन समस्यांचे निराकरण करावे असे निर्देश दिले जातील.
लवकरात लवकर या समस्या मार्गी लावून जनतेच्या समस्या मार्गी लावल्या जातील असेही त्या म्हणाल्या. सेशन कोर्टाच्या मान्यतेसाठी आगामी पंधरा दिवसांत उपमुख्यमंञी देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊ असे त्यांनी वकील बांधवाना सांगितले. आपण सर्व विश्वासाने या ठिकाणी आलात त्यामुळे मी आपणास निराश करणार नाही ,दिलेला शब्द खरा करून दाखविन असे त्या पुढे बोलताना म्हणाल्या.
व्यापारी बांधवाच्या अडचणी सोडवण्यासाठी आम्ही कट्टीबद्द असल्याचे सांगत पंकजा ताई मुंडे व प्रितम ताई मुंडे यांनी मुंदडा परिवारावर टाकलेल्या विश्वासाला आम्ही तडा जाऊ देणार नाहीत असे अक्षय मुंदडा यांनी स्पष्ट केले.
हा आगळा वेगळ्या कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी भाजपचे जेष्ठ नेते नंदकिशोर मुंदडा,वैद्यकीय आघाडी बीड जिल्हा अध्यक्ष डॉ. वासुदेव नेहरकर, महादेव सूर्यवंशी, नांदे सर, अतुल इंगळे, शरद इंगळे, सुनील घोळवे, राहुल गदळे,लिंबराज फरके ,शिवाजी पाटील यांनी परिश्रम घेतले.

