१७६) पर्यावरण जनजागरण, राष्ट्रभक्ती आणि आरोग्य साक्षरता.
विद्यार्थी विद्यार्थिनी व सर्वांसाठी अत्यंत सोपा शक्तीवर्धक उपाय..
सगळीकडेच आपण पाहतो की अनेक शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थी विद्यार्थिनी, नोकरदार मंडळी केवळ पोट भरावे या उद्देशाने सकाळी सकाळी हातगाडीवरील जंक फूड खात असतात. अशा मंडळींसाठी हा सोपा आहार सुचवितो आहे.
सायंकाळी पसाभर मूग घेऊन ते ग्लासभर पाण्यात भिजत घालावे.
सकाळी उठल्याबरोबर मूग भिजलेले पाणी प्यावे. हे पाणी अत्यंत पौष्टिक असते. कारण रात्रभर पाण्यात मूग भिजले की त्याचे टरफल फुटून त्यातून अंकुर बाहेर येण्याची प्रक्रिया चालू होते. म्हणजेच त्या ठिकाणी उत्पत्तीची प्रक्रिया होते. ही प्रक्रिया होत असताना त्या पाण्यात जी मूलद्रव्ये,जिवनसत्वे निर्माण होतात ती उत्पत्ती म्हणजे शरीराच्या वाढीसाठी,शरिराची झीज भरून काढण्यासाठी अत्यंत उपयुक्त असतात. जीवनावश्यक सर्व घटक याच पाण्यात असतात. नंतर शिल्लक राहिलेले मूग नाश्त्यासाठी खावेत. यासोबत एक मुळा, एक गाजर, एक काकडी, एक टोमॅटो, एक केळे हे सहज उपलब्ध होणारे बाजारातील पदार्थ खावेत. या सात्विक आहारामुळे शरीर सतेज होते. यामध्ये कोणतीही भेसळ नसते व याचे पचनही त्वरित होते. सकाळी सकाळी अशा प्रकारचा नाश्ता केल्यास ऍसिडिटी/आम्लपित्त/ कधीही होणार नाही. बलवृद्धी होईल. जंक फुडच्या दुष्परिणामांपासून मुक्त होण्यासाठी वरील आहाराचा अनुभव घ्या. खिशाला परवडेल असा हा सात्विक आहार आहे. वरील सर्व पदार्थ आपण घरामध्ये आणून ठेवू शकतो व त्याचा आहारात सहज वापर करू शकतो. तेव्हा या साध्या सोप्या आहार पद्धतीचा वापर करा व निरोगी रहा.
लेखक : चंद्रकांत शहासने
निसर्गोपचारक, पुणे मो.९८८१३७३५८५
कर्नाळा चॅरिटेबल ट्रस्ट पुणेच्या पर्यावरण जनजागरण, राष्ट्रभक्ती आणि आरोग्य साक्षरता उपक्रमांतर्गत प्रकाशित.

