इंदापूर प्रतिनिधी:१ नोव्हेंबर २०२२ रोजी काठमांडू या ठिकाणी झालेल्या नेपाळ भारत हिंदी शिक्षक एवं साहित्यकार संमेलनात राजेंद्र सर्जेराव रणमोडे यांना हिंदी आंतरराष्ट्रीय भाषा पुरस्काराने डॉ सौ.मंचला कुमारी झा( केंद्रीय हिंदी विश्वविद्यालय हिंदी विभाग केंद्रीय विश्वविद्यालय काठमांडू )यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले .
यावेळी राजेश कुमार (संशोधन केंद्र डी आर डी चे वैज्ञानिक) ,सौ.आसावरी बापट (निदेशक भारतीय दूतावास) , ओम प्रकाश जी (बाल साहित्यकार) ,डॉ.तुलसी दिवस(टोकियो विश्वविद्यालय ) प्रभाकर ढगे (साहित्यिक तथा संपादक),संयोजन प्रमुख कैलास जाधव ,केंद्रीय समन्वयक उस्मान मुलानी डॉ. नंदलाल चौधरी , नंदिकेश्वर विद्यालय जंक्शन चे प्राचार्य चंद्रकांत सोळसे सर , छत्रपती हायस्कूल भवानीनगर प्राचार्य रमेश मचाले सर ,व महात्मा फुले विद्यालय बत्तीस शिराळचे वसंत चौगुले सर ,निमगाव केतकी विद्यालयाचे श्री किसन भोंग सर, व नंदिकेश्वर विद्यालय निरवांगी चे सुधाकर भोंग सर ,सर्व हिंदी प्रेमी अध्यापक उपस्थित होते. महाराष्ट्र राज्याचे माजी सहकार मंत्री व शिवाजी एज्युकेशन संस्थेचे अध्यक्ष हर्षवर्धन पाटील संस्थेचे जेष्ठ संचालक उदयसिंह पाटील निरा भिमा सहकारी साखर कारखान्याचे संचालक राजवर्धन पाटील संस्थेचे सचिव किरण पाटील तसेच विद्यालयाचे प्राचार्य भिमराव आवारे सर यांनी रणमोडे सरांचे अभिनंदन केले.

