रेडा गावातील पवार कुटुंबाची गेले अनेक वर्षाची परंपरा जपत नागेश्वर दिंडी सोहळ्यातील वारकऱ्यांना कोल्हापुरी फेटे बांधून तोफाची सलामीसह फटाक्याची आतिषबाजीने केले जोरदार स्वागत
पवार कुटुंबांची गेली तीन दशकाची परंपरा
कोल्हापुरी फेटे, चहापाणी, फटाक्याच्या अतिषबाजी, स्वागताने वारकरी गेले भारावून
इंदापूर प्रतिनीधी:सालाबाद प्रमाणे कार्तिकी एकादशीनिमित्त महाराष्ट्रातून आणि देशातून तमाम लाखो वारकरी पंढरपूरच्या दिशेने विठ्ठलाच्या दर्शनासाठी, यात्रेनिमित्त जात असतात. त्याचप्रमाणे अहमदनगर जिल्ह्यातील, श्रीगोंदा तालुक्यातील कौठा गावातून श्री नागेश्वर मंदिर ते पंढरपूर पायी दिंडी सोहळा गेली ४५ वर्ष पायीवारी करत आहे. (दि.३०) ऑक्टोबर रोजी इंदापूर तालुक्यातील रेडा गावातील पवार कुटुंब गेली तीन दशक या दिंडी सोहळ्याचा चहापाणी, फटाक्याची अतिषबाजी करत दिंडी सोहळ्याचे व वारकऱ्यांचा स्वागत करत असते.
गुरुवर्य ह.भ.प. निवृत्ती शिपलकर व वैकुंठवासी गुणाईमाता शिपलकर यांच्या प्रेरणेने, वैकुंठवासी गुरुवर्य ह. भ. प. रामदास महाराज सोनवणे(बीडकर) यांच्या कृपाशीर्वादाने गेली ४५ वर्ष हा दिंडी सोहळा पायवारी करत असून कार्तिकी एकादशीनिमित्त विठ्ठलाच्या चरणाच्या दर्शनाकडे आस लावून ऊन, वारा, पाऊस, थंडी याचा विचार , तमा न करता पंढरपूर दिशेने जात असतो. गुरुवर्य ह.भ.प.दातीर महाराज (काष्टीकर) गुरुवर्य ह. भ. प. हरी महाराज घोडके (देवळेकर) हे या दिंडी सोहळ्याचे नियोजन करत असतात. दिनांक २६ ऑक्टोबर रोजी श्री नागेश्वर मंदिर कौठा येथून या दिंडीचे प्रस्थान होत असून आठ दिवस दरमजल प्रवास करत ही दिंडी सोहळा (दि.२) नोव्हेंबर रोजी पंढरपूर मध्ये पोहोचतो.कौठा येथून निघालेला हा दिंडी सोहळा खडकी, डाळज नं.-२, मुक्ताबाईचे शेळगाव, रेडा, माळवाडी, तोंडले -बोंडले, पंढरपूर, सराफवाडी, भिगवण, कळस, फलटणकर मळा, गोडलिंब, म्हसोबावाडी ग्रामस्थ, बंडिशेगांव, खारतोडे वस्ती, विकास वाडी, खंडाळी, नागेश्वर मंदिर असा हरिनाम जयघोष करत कार्तिक शु. नवमी ते कार्तिक शु.द्वादशी पर्यंत चार दिवस पंढरपूर येथे मुक्कामी असतो.रोज संध्याकाळी प्रवचन, कीर्तन, भजन, अन्नदान असा दिनक्रम असतो या दिंडी सोहळा मध्ये वारकरी स्वतःचा बिछाना सोबत घेऊन शिस्तबद्ध पद्धतीने पंढरपूर हे रवाना होतो. दिंडीचे विनेकरी म्हणून कुमार काका कुलकर्णी, मारुती राहींज तर चोपदार हनुमंत नारायण शिपलकर सर्व नागेश्वर भक्त मंडळ व्यवस्थापन करत असते.
गेले तीन दशकाच्यावरती रेडा गावातील रेडा ग्रामपंचायतचे माजी ग्रामपंचायत सदस्य सुखदेव तुकाराम पवार व पवार कुटुंब या दिंडी सोहळ्याचे व येणाऱ्या वारकऱ्यांची मोठ्या मनोभावेने फटाक्याची आतिषबाजी करत जोरदार स्वागत करत असते. चहापाण्याची व्यवस्था आणि कोल्हापुरी फेटे बांधून वारकऱ्यांचे स्वागत करण्यात येते. दैनिक स्वाभिमानी छावा, दैनिक दामाजी एक्सप्रेस ,दैनिक राष्ट्रसंचार, दैनिक कॉमन न्यूज ,साप्ताहिक शिवसृष्टी, वैभव लक्ष्मी, आज २४ तास, हिंदवी स्वराज न्यूज पोर्टल यांच्या वतीने व इलेक्ट्रॉनिक मीडिया व प्रिंट मीडिया चे इंदापूर तालुका प्रतिनिधी कैलास पवार या सर्व वारकऱ्यांना कोल्हापुरी पद्धतीने फेटे बांधून त्यांचे स्वागत करतात.हा दिंडी सोहळा प्रस्थान केल्यापासून दिंडी सोहळ्यातील वारकरी मंडळी रेडा गावातील पवार कुटुंबाच्या स्वागताचे आणि चहापाण्याची आतुरतेने वाट पहात असतो. त्यांच्या स्वागत आणि चहापाण्याच्या सेवेने आम्ही भारावून जातो व आमचा दिंडी दरम्यान केलेला प्रवास ,त्यामधील थकवा नाहीसा होतो. पवार कुटुंब आणि त्यांच्या सर्व परिवार हे मोठ्या भक्ती भावाने वारकऱ्यांची सेवा करतात. गेली अनेक तीन दशकाच्या वरती ही परंपरा त्यांनी जपलेली आहे. असे दिंडी सोहळ्याचे प्रमुख व वारकरी, महिलांनी प्रतिक्रिया दिली. सदर सर्व दिंडी संदर्भातील माहिती ह.भ.प. दत्तात्रय शिपलकर महाराज, ह. भ. प. सोमनाथ महाराज शिपलकर , ह.भ. प. भानुदास दातीर,ह.भ.प.हरि घोडके महाराज, ह. भ. प. कुमार काका कुलकर्णी, चोपदार ह.भ.प. हनुमान शिपलकर, ह. भ. प.संजय कुदळे, पांडुरंग मचाले, बाळासाहेब हाके, ह. भ. प. वामन राहींज, ह. भ. प. बबन पवार महाराज (टेलर) व उपस्थित मोठ्या संख्येने असणारे वारकरी, दिंडी सोहळ्याचे अध्यक्ष, उपाध्यक्ष यांनी प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधी यांना माहिती दिली.

