श्री संत मुक्ताबाई विद्यालय शेळगाव च्या सन २००० च्या १० वी च्या बॅच चा माजी विद्यार्थी स्नेहमेळावा कडबनवाडी वनोद्यानात हसतखेळत संपन्न.
मेळाव्यास माजी शिक्षकांची विशेष उपस्थिती.
इंदापूर प्रतिनिधी:श्री संत मुक्ताबाई विद्यालय शेळगाव च्या सन २००० च्या १० वी च्या बॅच चा माजी विद्यार्थी स्नेहमेळावा दिनांक सहा नोव्हेंबर रोजी कडबनवाडी वन उद्यानात पार पडला. या बॅचमधील अनेक विद्यार्थी आज वेगवेगळ्या क्षेत्रात अग्रेसर आहेत...कोणी डॉक्टर, कोणी अभियंता, वकील,शिक्षक,नामवंत कंपन्यांमध्ये,ग्रामसेवक,टेलर, बँकेत,प्रगतशील शेतकरी, व्यावसायिक ,व्यापारी अशा अनेक क्षेत्रात आज सेवा करत आहेत.हे पाहून सर्वांनाच आनंद वाटला.माजी विद्यार्थी स्नेहमेळाव्यात घेतला एक स्तुत्य निर्णय.एक जॉईंट बँक खाते काढून दरमहा प्रत्येकाने २०० रु जमा करणे....त्या रकमेतून सामाजिक कामे,शैक्षणिक मदत,अनाथ आश्रमास मदत,आवश्यकतेनुसार मित्रांना मदत करण्याचे ठरले.
शेळगाव गावातील mpsc, upsc, स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांन साठी वाचनालय(अभ्यासिका) उभारणार....माजी विद्यार्थी बॅच सन..२०००.इ १० वी
दिनांक ६ नोव्हेंबर २०२२ रोजी श्री संत मुक्ताबाई विद्यालय इ.१० वी बॅच सन २००० च्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा मोठ्या उत्साहात पार पडला. कार्यक्रमाची सुरुवात कोरोना व अन्य कारणांनी आज आपल्यात नसणाऱ्या मित्रांना व माजी शिक्षकांना श्रद्धांजली वाहण्यात आली.नंतर कार्यक्रमाचे प्रास्ताविक करण्यात आले.नंतर उपस्थित माजी शिक्षक व विद्यार्थी बालमित्रांचे स्वागत करण्यात आले.नंतर माजी विद्यार्थी मनोगते व्यक्त करून जुन्या आठवणींना उजाळा देण्यात आला.अनेक माजी विद्यार्थ्यांनी मनोगते व्यक्त केली.नंतर उपस्थित माजी शिक्षक श्री तोडकर सर,श्री पवार सर, श्री कांबळे सर यांनी मनोगते व्यक्त करून सर्व माजी विद्यार्थ्यांना शुभेच्छा देऊन मार्गदर्शन केले.जुन्या आठवणींना उजाळा देण्यात आला.कार्यक्रमास आवर्जुन उपस्थित निवेदक धापटे सरांनी देखील खूप मार्मिक विचार व्यक्त करून मैत्री, मेळाव्याची गरज,महत्व यावर माहिती सांगितली.नंतर उपस्थित सर्वानी शाकाहारी/मांसाहारी जेवणाचा आस्वाद घेतला.फोटोसेशन,गप्पा,फेटे,भेटींनी परिसर रंगून गेला होता... निसर्गाच्या सानिध्यात,वनविभागात होणारा स्नेहमेळावा हा बहुतेक पहिलाच असावा.हॉटेल वर मेळावा घेण्यापेक्षा तो निसर्गाच्या सानिध्यात घेतल्याने या मेळाव्याचे विशेष कौतुक होत आहे.सर्व बालमित्रांनी वन उद्यानात फिरून मौजमस्ती केली.खरच काल कोणाच्या ही चेहऱ्यावर कसलीही काळजी नव्हती सर्वांच्या चेहऱ्यावर हास्य होते.काही मित्रांची तर २० ते २२ वर्षांनी भेट झाली त्यामुळे तो आनंद अवर्णनीय होता.कोण कोणाचा बेंच मेट होता ,कोणी कसा मार खाल्ला, कोणत्या सरांनी खूप मारले अशा अनेक गोष्टींवर चर्चा करत फेरफटका मारला.शेवटी दर वर्षी स्नेहमेळावा घेण्याचे ठरले.या मेळाव्यासाठी जवळपास ४० बालमित्र जमा झाले होते.कालचा दिवस सर्व माजी विद्यार्थ्यांसाठी अविस्मरणीय असाच होता.मेळावा यशस्वी करण्यासाठी बंडू बनसोडे, विकास हगारे,तानाजी शिंगाडे यांच्या सह सर्वांनीच सहकार्य केले.शेवटी बंडू बनसोडे याने सर्वांचे आभार मानून पुन्हा दरवर्षी मेळावा एकत्र येऊन असाच दिमाखात साजरा करू असे सांगून कार्यक्रमाची सांगता केली.

