shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या स्वयंसेवकांनी श्रमदानातून केला परिसर चकाचक"!-


दापोडी रेल्वे स्टेशन' परिसर-श्रीमती सी. के .गोयल कलाआणिवाणिज्य महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या स्वयंसेवकांनी श्रमदानातून केला चकाचक"!- 

 पुणे :-दापोडी येथील जनता शिक्षण संस्थेच्या श्रीमती सी.के.गोयल कला आणि वाणिज्य महाविद्यालय 
 आणि पिंपरीचिंचवडमहानगरपालिका आरोग्य विभाग दापोडी यांच्या "संयुक्त विद्यमाने" शनिवार दिनांक १२/११//२०२२ रोजी सकाळी९.30 ते १२:०० या वेळेत दापोडी रेल्वे स्टेशन परिसरात ""स्वच्छभारत"" अभियानांतर्गत परिसर स्वच्छता/ श्रमदान उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

 विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक जाणीव निर्माण व्हावी,स्वच्छतेचे महत्व समजावे,समाजातील प्रश्न समजावेत, समाजासाठी आपण योगदान द्यावे,श्रमप्रतिष्ठा निर्माण व्हावी निर्माण व्हावी,उद्देशाने या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.या उपक्रमांतर्गत गोयल महाविद्यालयातील प्राध्यापक व राष्ट्रीय सेवा योजनेचे विद्यार्थ्यां, पिंपरी चिंचवड महानगरपालिका आरोग्य विभागातील कर्मचारी यांनी एकत्रित श्रमदानातून दापोडी-पुणे, रेल्वे स्टेशन परिसर या सार्वजनिक ठिकाणचा परिसर स्वच्छ केला.

श्रमदानातून दापोडी रेल्वे स्टेशन येथील प्लॅटफॉर्म क्रमांक एक आणि दोन परिसर, रेल्वे स्टेशन कर्मचारी वसाहत परिसर, रेल्वे रूळ परिसर, येथे स्वच्छता करून गाजर गवत काढणे, झाड लोड करणे, प्लास्टिक गोळा करणे, केर कचरा गोळा करणे यासारखी कामे करून परिसर स्वच्छ केला.
       श्रमदानकार्यक्रमांमध्ये गोयल महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजनेचेविद्यार्थी व प्राध्यापक आणि पिंपरी चिंचवड आरोग्य विभागाचे कर्मचारी मिळून ६५ व्यक्तींनी सहभाग घेतला.श्रमदान कार्यक्रमासाठी झाडू,विळे, खुरपी, टिकाव, खोरी, कुदळी, घमेली, यांचा वापर करण्यात आला.

कार्यक्रमाचे संयोजन: प्र. प्राचार्य, डॉ.सुभाष सूर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रीय सेवा योजने विभाग प्रमुख, प्रा. डॉ.बाळासाहेब माशेरे, आणि राष्ट्रीय  विभागातील इतर प्राध्यापकांनी केले.श्रमदान कार्यक्रमांमध्ये  प्रा.सिद्धार्थ कांबळे,प्रा. परबतराव बैसाणे, प्रा. महेंद्र शिंद, प्रा.प्रितिश पठारे, प्रा. अमरदीप गुरमे,प्रा.दिपाली खर्डे, प्रा.पवार प्रियंका, श्री. लक्ष्मण कोहिणकर, श्री. लक्ष्मण मुरकुटे, श्री. कपिल कांबळे, आणि पिंपरी चिंचवड आरोग्य विभागाचे मा.भूपेश बोडके, मा. नेहा साठे, मा. मयुरी काकडे, मा. अतुल वाघमारे, मा. विजय पेंडे, मा. मंगेश साळवे मा. अमित गोरे, मा .संजय पवार यांनी विद्यार्थ्यांबरोबर सहभागी होऊन स्वतः श्रमदान केले.

विद्यार्थ्यांमध्ये रोहित गोडबोले, जयराम मोरे, मंदार गावडे, रत्नप्रभा मोरे, काजल काटे, भूमी कांबळे यांनी कार्यक्रमाचे नियोजनासाठी मोलाचे सहकार्य केले. दापोडी येथील रेल्वे स्टेशन सारख्या सार्वजनिक ठिकाणी परिसर स्वच्छता करून गोयल महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी समाजाला स्वच्छतेचे महत्व पटवून देऊनचांगला संदेश दिला आहे. या कार्यक्रमाचे दापोडी परिसरात सर्वत्र कौतुक होत आहे.

कार्यक्रमाच्या शेवटी विद्यार्थ्यांना अल्पोपहार देण्यात आला.
close